पारमिता

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:पारमिता साचा:बौद्ध धर्म पारमिता (संस्कृत, पाली) किंवा पारमी (पाली) म्हणजे "परिपूर्णता" किंवा "पूर्णत्व" होय. तांत्रिकदृष्ट्या, पारमी आणि पारमिता दोन्ही पाली भाषेचे शब्द आहेत, पाली साहित्यात पारमीचे बरेच संदर्भ आहेत.साचा:संदर्भ हवा

दहा पारमिता

दहा पारमिता ह्या शील मार्ग अाहेत..

१) शील

शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल. शरीर आणि मन शुधी करणे.

२) दान

स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, देह अर्पण करणे. देनाचा भाव मनात ठेवून देत राहणे.

३) उपेक्षा

निरपेक्षतेने सतत प्रयत्‍न करीत राहणे.

उदाहरण- पृथ्वीवर मानव हवे तसे खड्डे करतो पण पृथ्वी अगदी काहीच परिणाम होत नाही पृथ्वीवर. पृथ्वी जे वागणे आहे त्याला उपेक्षा म्हणता येईल. 

४) नैष्क्रिम्य

ऐहिक सुखाचा त्याग करणे.घर त्याग करून परिवाजक होऊन जगणे.

५) वीर्य

हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे.

६) शांती

शांति म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे. मानव जाणीपूर्वक शांत राहणे निवडतो. त्याला द्वेषाने उत्तर देणे मोठ्या मनाने टाळतो.

७) सत्य

सत्य म्हणजे खरे, माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये. सत्य पूर्ण व्यवहार करणे.

८) अधिष्ठान

ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय. चांगल्या ध्येय असणे देखील बंधनकारक आहे.

९) करुणा

मानवासकट सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता व्यवहार करणे.


१०) मैत्री

मैत्री म्हणजे सर्व प्राणी, मित्र, शत्रू याविषयीच नव्हे तर सर्व जीवनमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे.साचा:संदर्भ हवा

संदर्भ

साचा:संदर्भयादी साचा:बौद्ध विषय सूची