पूर्णगड किल्ला
साचा:विस्तार साचा:माहितीचौकट किल्ला
पूर्णगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
रत्नागिरी् जिल्यातील मुचकुंदी नदीच्या मुखाजवळ पूर्णगडाचा छोटासा किल्ला गतवैभवाच्या खाणाखूणा जपत उभा आहे. पूर्णगडाच्या दक्षिण अंगाला मुचकुंदी नदीची खाडी असून पश्चिमेकडे सागर किनारा आहे. लहानश्या टेकडीवर असलेल्या पूर्णगड किल्ल्याच्या पूर्व उतारावर पूर्णगड नावाचे गाव वसलेले आहे.
मुंबई पणजी महामार्गावर हातरवांबा फाटा आहे. येथून पश्चिमेकडे रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण सागर किनाऱ्यावर वसलेले आहे. रत्नागिरी मधील प्रेक्षणीय स्थळे तसेच थिबा राजवाडा पाहून आपण पावस या धार्मिक क्षेत्राकडे निघतो. वाटेतील भाटय़े खाडीवरील पूल ओलांडल्यावर भाटय़े गाव लागते. या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा सेनापती मायनाक भंडारी यांचे स्मारक आहे. ते त्यांच्या वंशजांच्या घराच्या अंगणात आहे.
- पावसमध्ये स्वामी स्वरुपानंदाचे स्मृतीमंदिर आहे. येथून साधारण १० कि. मी. अंतरावर पूर्णगड किल्ला आहे.
गावरवडीच्या पुलाच्या अलिकडेच पूर्णगड गाव आहे..
पाहण्यासारखे[संपादन | स्रोत संपादित करा]
- या किल्ल्याच्या दाराजवळ मारुती मंदिर आहे. या जुन्या मारुती मंदिराची सध्या गावकऱ्यांनी रंगरंगोटी केलेली आहे. मंदिराजवळच पूर्णगडाचा दरवाजा आहे. शिवकालीन बांधकामाच्या वैशिष्टय़ांप्रमाणे हा दरवाजा लपवलेला आहे. दरवाजावर गणेश तसेच चंद्र- सूर्याची शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकऱ्यांच्या देवडय़ा आहेत. येथेच दगडात कमळे कोरलेली पहायला मिळतात.
येथे तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. तटबंदीवरून गडाची पूर्ण फेरी मारता येते. पश्चिम अंगाची काही तटबंदी ढासळलेली आहे. पण इतर तटबंदी काळ्या पाषाणातील असून अजूनही भक्कम अशी आहे. किल्ल्याला पश्चिमेकडे लहानसा दिंडी दरवाजा आहे.
- या गडामध्ये गडकऱ्यांच्या वास्तूचे अवशेष तसेच इतरही अवशेष पहायला मिळतात. लहानसा आयताकृती आकार असलेला पूर्णगड पहायला अर्धा तास पुरतो.
गडावरील राहायची सोय[संपादन | स्रोत संपादित करा]
या किल्ल्यावर राहण्याची सोय उपलब्ध नाही. पूर्णगड हे जवळचे गाव आहे जेथे निवासाची सोय उपलब्ध आहे.
गडावरील खाण्याची सोय[संपादन | स्रोत संपादित करा]
या किल्ल्यावर खाण्याची सोय नाही.
गडावरील पाण्याची सोय[संपादन | स्रोत संपादित करा]
पूर्णगडावर पाण्याची सोय नाही. पूर्वी गडाबाहेरील विहीरीतून गडामध्ये पाणीपुरवठा केला जात असे. लहान आकाराचा किल्ला म्हणून पूर्णविरामाच्या लहानश्या टिंबासारखा किल्ला म्हणून पूर्णगड नाव पडले. तर काहींच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधणीचे काम येथे थांबवले म्हणून हा पूर्णगड.
गडावर जाण्याच्या वाटा[संपादन | स्रोत संपादित करा]
जलदुर्ग असल्याने पायथ्याच्या गावातून एक सोपी वाट गडावर घेऊन जाते.
मार्ग[संपादन | स्रोत संपादित करा]
Ratnagiri rajapur
जाण्यासाठी लागणारा वेळ[संपादन | स्रोत संपादित करा]
संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]
- सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो
- डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
- दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
- किल्ले - गो. नी. दांडेकर
- दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
- ट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया
- सह्याद्री - स. आ. जोगळेकर
- दुर्गकथा - निनाद बेडेकर
- दुर्गवैभव - निनाद बेडेकर
- इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर
- महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर
- गडसंच - बाबासाहेब पुरंदरे
- किल्ले पाहू या - प्र. के. घाणेकर
- गडदर्शन - प्र. के. घाणेकर
- गड आणि कोट - प्र. के. घाणेकर
- इये महाराष्ट्र देशी - प्र. के. घाणेकर
- चला जरा भटकायला - प्र. के. घाणेकर
- साद सह्याद्रीची, भटकंती किल्ल्यांची - प्र. के. घाणेकर
- सोबत दुर्गांची - प्र. के. घाणेकर
- मैत्री सागरदुर्गांची - प्र. के. घाणेकर
- दुर्गांच्या देशात - प्र. के. घाणेकर
- गड किल्ले गती जयगाथा - प्र. के. घाणेकर
- ओळख किल्ल्यांची - भाग १ - प्र. के. घाणेकर
- ओळख किल्ल्यांची - भाग २ - प्र. के. घाणेकर
- ओळख किल्ल्यांची - भाग ३ - प्र. के. घाणेकर