पेद्दपल्ली

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:About साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र पेद्दपल्ली (Peddapalli) हे भारताच्या तेलंगणा राज्यातील पेद्दपल्ली जिल्ह्यातील एक शहर आहे. हे पेड्डापल्ली जिल्ह्याचे व पेद्दपल्ली मंडळाचे मुख्यालय आहे. हे राज्याची राजधानी हैदराबादच्या उत्तरेस सुमारे १९७ किलोमीटर (१२२ मैल) अंतरावर, करीमनगरपासून ३६ किलोमीटर (२२ मैल), रामागुंडमपासून २८ किलोमीटर (१७ मैल) अंतरावर आहे आणि पेद्दपल्लीमध्ये PDPL (पेद्दपल्ली रेल्वे जंक्शन) नावाचे रेल्वे जंक्शन आहे जे PDPL(पेद्दपल्ली) - KRMR(करीमनगर) - NZB(निजामाबाद) रेल्वे लाईन आणि नवी दिल्ली (NDLS) - चेन्नई सेंट्रल (MAS) रेल्वे लाईनला जोडते. येथे दोन गाड्या संपतात. करीमनगर तिरुपती एक्सप्रेस रेल्वे इंजिन येथे इलेक्ट्रिक इंजिनमध्ये बदलते.

भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार, पेड्डापल्लीची लोकसंख्या ४१,१७१ आहे. २०१६ मध्ये लोकसंख्या वाढीमुळे, पेड्डापल्लीची नागरी संस्था नगर पंचायतीमधून नगरपरिषदेत श्रेणीसुधारित करण्यात आली.

इतिहास

लोकसंख्या

२०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या १०,४६१ कुटुंबांसह ४११७१ होती. एकूण लोकसंख्येमध्ये २०,६४८ पुरुष आणि २०,५२३ स्त्रिया आहेत- लिंग गुणोत्तर १,००० पुरुषांमागे ९९४ स्त्रिया. ०-६ वर्षे वयोगटातील ४,०५० मुले आहेत. सरासरी साक्षरता दर ७६.२९ % होता.

७६.२३% लोक हिंदू आणि (२२.१६%) मुस्लिम होते. इतर धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये ख्रिश्चन (१.३७%), शीख (०.०२%), बौद्ध (०.०१%), जैन (०.०१%) आणि कोणताही धर्म नसलेले (०.२०%) यांचा समावेश होतो.[१][२]

भुगोल

पेद्दपल्ली हे १८.६१६२°N, ७९.३८३२°E वर स्थित आहे. पेद्दपल्लीची सरासरी उंची २०० मीटर आहे.[३] वार्षिक सरासरी पर्जन्यमान ९६६.४ मिलिमीटर (३१.० इंच) आहे.[४]

पर्यटन

संस्कृती

प्रशासन

पेद्दपल्ली नगरपालिका ही शहराच्या नागरी गरजांवर देखरेख करणारी नागरी संस्था आहे. पेद्दपल्ली नगर पंचायत २०११ मध्ये २० निवडणूक प्रभागांसह स्थापन करण्यात आली. लोकसंख्येच्या वाढीमुळे २०१६ मध्ये ती नगरपालिका (नगर परिषद पेद्दपल्ली) बनली . सध्या नगरपालिकेचे कार्यक्षेत्र २६.१९ चौ.कि.मी. (१०.११ चौरस मैल) मध्ये पसरलेले असून ३६ प्रभाग आहेत.[५][६] पेद्दपल्ली हे शहर पेद्दपल्ली विधानसभा मतदारसंघात येते. जो पेद्दपल्ली लोकसभा मतदारसंघात मोडतो.

वाहतुक

पेद्दपल्ली येथे TSRTC (तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ)चे बसस्थानक आहे आणि सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरवते. पेद्दपल्ली येथे एक रेल्वे स्टेशन आहे ज्याला पेद्दपल्ली रेल्वे जंक्शन म्हणतात.[७]

शिक्षण

हे देखाल पहा

संदर्भ

साचा:संदर्भयादी