फलटण संस्थान

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

फलटण संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीमधील एक संस्थान होते.

मुख्यालय

या संस्थानाचे मुख्यालय फलटण या गावात आहे. या संस्थानात एकूण ७२ गावे आहेत. याचे क्षेत्रफळ ३९७ चौरस मैल आहे.

संस्थानिक

या संस्थानाचे संस्थानिक निंबाळकर घराणे आहे.

स्वातंत्र्योत्तर काळ

भारत स्वतंत्र झाल्यावर हे संस्थान निंबाळकर यांनी भारतीय संघराज्यात विलीन केले. हे आत्ताच्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे. व ते तालुक्याचे ठिकाण आहे.