फ्रान्स मित्र मंडळ

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:बदल श्री. अच्युतराव आपटे व द गलरी ह्यांनी मिळून १९६७ साली फ्रान्स मित्र मंडळाची स्थापना केली. त्याची वाढ निर्मलाताई पुरन्दरे ह्यांच्या परिश्रमाने झाली.

हे मंडळ फ्रान्समधील 'परस्पेक्टिव एसिएन्' ह्या संस्थेशी निगडित आहे. ह्या दोन मंडळांचे काम परस्पर सहकार्याने चालते.

ह्या मंडळातर्फे दर वर्षी भारतातील आठ केन्द्रांवरून साधारण पंचवीस व्यक्ती फ्रान्सला पाठवल्या जातात. ह्या व्यक्तींची निवड त्या त्या केन्द्रावर् केली जाते. समाजातील एखाद्या गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीची निवड होते. तसेच दर वर्षी फ्रान्समधूनही काही लोकांचा गट भारतात येतो.

सांस्कृतिक देवाण घेवाण ह्या उद्देशाने हे गट परस्पर देशांना भेटी देतात. ह्या भेटींवेळी गट सदस्य एकमेकांच्या घरी राहतात. विविध स्थानिक स्थळांना भेटी देतात. परस्परांच्या चालिरिती समजून घेतात. एकंदरीने परस्पर स्नेहव्रृद्धी साधली जाते.