बर्ट्रांड रसेल

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट साहित्यिक बर्ट्रांड आर्थर विल्यम रसेल, तिसरा अर्ल रसेल (Bertrand Arthur William Russell, 3rd Earl Russell; १८ मे १८७२ - २ फेब्रुवारी १९७०) हा एक ब्रिटिश लेखक, तत्त्वज्ञ, इतिहासकार व गणितज्ञ होता. विसाव्या शतकामधील एक आघाडीचा तत्त्वज्ञ मानला जाणाऱ्या रसेलला १९५० सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. रसेल जगामधील प्रतिष्ठित शांतीपुरस्कर्त्या व्यक्तींपैकी एक होता. त्याने पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, व्हियेतनाम युद्ध इत्यादी जागतिक युद्धांवर टीका केली होती तसेच त्याचा अण्वस्त्र बंदीला पाठिंबा होता.

ग्रंथ संपदा

१. प्रिंसिपल्स ऑफ मॅथेमॅटिका

२. प्रिंसिपिया मॅथेमॅटिका

३. ऑटोबायोग्राफी

४. एज्युकेशन अँड द सोशल ऑर्डर

शिक्षण विषयक विचार

१. शिक्षण लोकशाही विकासासाठी

२. बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करणे.

३. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे असावे .

४. बालकांच्या वैयक्तिक गुणांकडे लक्ष

५. बालकांच्या अभिरुचीनुसार अध्यापन

६. शिक्षणाचा कालावधी ठरवणे.

७. उच्च शिक्षणाचा विस्तार व संशोधनाला प्राधान्य देणारे शिक्षण

८. योग्य शाळेत बालकाचे शिक्षण [१]

बाह्य दुवे

साचा:कॉमन्स वर्ग

साचा:S-start साचा:Succession box साचा:S-end