बाळकृष्ण शिवराम मुंजे
Appearance
साचा:माहितीचौकट चळवळ चरित्र बाळकृष्ण शिवराम मुंजे (डिसेंबर १२, इ.स. १८७२ - मार्च ४, इ.स. १९४८) भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक पुढारी व कॉंग्रेसमधील लोकमान्य टिळकांच्या जहाल विचारसरणीचे समर्थक होते. पेशाने डॉक्टर असलेल्या मुंज्यांनी उत्तरायुष्यात हिंदू पुनरुत्थानाकरता हिंदू महासभेच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्यांनी नाशकातील 'भोंसला मिलिटरी स्कूल' ही सैनिकी शाळेच्या स्थापण्याकरता पुढाकार घेतला; तसेच डेहराडून येथील 'इंडियन मिलिटरी अकॅडमी' या सैनिकी प्रशिक्षणसंस्थेच्या स्थापनेतही पुढाकार घेतला.