बुराकुमीन

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

बुराकुमीन (जपानी: 部落民) किंवा बुराकू हा जपान मधील एक समाज आहे, जो जपानच्या पारंपारिक जातीव्यवस्थेतील एक अस्पृश्य समाज होता. २०१५ मध्ये या समाजाची लोकसंख्या जवळपास तीस लाख होती.[१]

बुराकुमीन वर्ग परंपरागत व्यवसाय म्हणून जपानमध्ये हलकी समजली जाणारी कामे करत असत; जसे की, डोंब किंवा चांडाळ, चर्मकार, खाटीक काम इत्यादी. कालांतराने जपानमधील इडो कालखंडात किंवा टोकूगावा समाजव्यवस्थेत हा समाज जातीव्यवस्थेतील अस्पृश्य वर्ग म्हणून गणल्या जाऊ लागला. त्यामुळे बुराकुमीन लोकांना गंभीर भेदभाव, तुच्छतेची वागणूक, सामाजिक आणि आर्थिक शोषण तसेच बहिष्काराचा सामना करावा लागत असे.

नंतर इ.स. १८६८ मध्ये मेइजी पुनर्स्थापना नावाच्या चळवळीमुळे बुराकुमीन लोकांना जातीव्यवस्थेत भेदभाव रहित योग्य स्थान देण्यात आले. परंतु त्यानंतर बराच काळ समाजातील पूर्वदूषित मानसिकतेमुळे अस्पृश्यतेची भावना मिटल्या गेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अस्पृश्यता निर्मूलनाची व जातीअंताच्या लढ्याची चळवळ इतर देशातील शोषित लोकांना प्रेरणा देत गेली. बुराकुमीन जमातीच्या नेत्यांनी भारतात येऊन आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला व त्यापासून प्रभावित झाले. आणि तेव्हापासून बुराकुमीन जमातीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपले प्रेरणास्थान मानण्यास सुरुवात केली.[२][३]

संदर्भ

साचा:संदर्भयादी