बॉम्बे टॉकीज

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
बोंम्बे टॉकिज

बॉम्बे टॉकीज हा सन १९३४ साली स्थापन झालेला एक चित्रपट निर्मिती स्टुडिओ होता. त्या कालावधीत या स्टुडिओने सुमारे ४० चित्रपट निर्माण केलेत. हा मुंबईच्या (पूर्वीचे - बॉम्बे) मालाड या उपनगरात स्थित होता.

बॉम्बे टॉकीज ह्या चित्रपट निर्मिती स्टुडिओची स्थापना हिमांशु रायदेविका राणी यांनी केली. सन १९४० मध्ये राय यांच्या मृत्यूनंतर, देविका राणी यांनी त्या स्टुडिओचा कार्यभार सांभाळला. सन १९४३ पर्यंत अशोककुमार हा नट या स्टुडिओतील एक प्रमुख कलाकार होता. त्यानंतर त्याने शशधर मुखर्जी यांना सोबत घेऊन फिल्मिस्तान हा स्टुडिओ स्थापला. राणी यांच्या निवृत्तीनंतर या स्टुडिओचे अधिग्रहण अशोककुमार व मुखर्जी यांनी केले. या स्टुडिओत निर्माण झालेला शेवटचा चित्रपट जून १९५४ मध्ये विमोचित झाला.

साचा:विस्तार