बॉम्बे हाय

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विकिडेटा माहितीचौकट बॉम्बे हाय तथा मुंबई हाय हे अरबी समुद्रात मुंबईपासून १७६ कि.मी. पश्चिमेस असलेले नैसर्गिक तैलक्षेत्र आहे. ओ.एन.जी.सी. मुंबई हायचे परिचालन करते.

मुंबई हाय तैलक्षेत्राचा शोध १९६४-६७ च्या दरम्यान भारत आणि रशियाच्या संयुक्त तेल संशोधन संघाला भूगर्भ संशोधन जहाजातून खंभातच्या अखातात केलेल्या मोहीमेत लागला. ३ फेब्रुवारी, इ.स. १९७४ रोजी बॉम्बे हाय येथे सागरसम्राट ही पहिली खनिज तेलविहीर खणली गेली. इ.स. २००४ पर्यंत मुंबई हाय भारताच्या एकूण नैसर्गिक तेल मागणीच्या १४% मागणीची पूर्तता करत होती.

या क्षेत्रातून पाईपलाईनद्वारे नैसर्गिक वायू उरण येथे आणून साठवला जातो. भर समुद्रातील देशाचे ..गौरवशाली वैभव ..

बॉम्बे हाय .....मुंबईपासून १७६ कि.मी. पश्चिमेस असलेले नैसर्गिक तैलक्षेत्र

सागरसम्राट ही पहिली खनिज तेलविहीर

बॉम्बे हाय तथा मुंबई हाय हे अरबी समुद्रात मुंबईपासून १७६ कि.मी. पश्चिमेस असलेले नैसर्गिक तैलक्षेत्र आहे. भूपृष्ठाखालील खडकांच्या संरचनेचे वर्णन करताना ‘हाय’ हा शब्द वापरला जातो. हे तेल क्षेत्र मुंबईच्या वायव्येस १७६ किमी. अंतरावर उथळ पाण्यातील भागात आहे.

मुंबई हाय तैलक्षेत्राचा शोध १९६४-६७ च्या दरम्यान भारत आणि रशियाच्या संयुक्त तेल संशोधन संघाला भूगर्भ संशोधन जहाजातून खंभातच्या अखातात केलेल्या मोहीमेत लागला. ३ फेब्रुवारी, इ.स. १९७४ रोजी बॉम्बे हाय येथे सागरसम्राट ही पहिली खनिज तेलविहीर खणली गेली.

मुंबईजवळील उथळ समुद्राच्या तळाखाली सापडलेले अतिशय मोठे खनिज तेल क्षेत्र. १९७० मध्ये भारतात जमिनीवर फक्त आसाम आणि गुजरात या दोन राज्यांत खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचे उत्पादन होत असे. देशातील वाढत्या औद्योगिकरणामुळे खनिज तेलाची मागणीही वाढत होती. या वेळी खनिज तेलाच्या साठ्यांचा शोध घेण्याचे काम किनाऱ्यालगतच्या उथळ समुद्रातही सुरू झाले. भूकंपीय सर्वेक्षणाचा वापर करण्यात आला

पश्चिम किनाऱ्याजवळील गुजरातमध्ये अंकलेश्वर, कलोल, मेहसाणा, खंबायत इ. क्षेत्रांतून खनिज तेल व नैसर्गिक वायूचे उत्पादन चालू होतेच. हे लक्षात ठेवून खंबायतच्या आखातातील उथळ समुद्रात आणि गुजरात व महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीच्या भागात विशेष काळजीपूर्वक शोध घेण्यात आला. याचा परिणाम म्हणजे बॉंबे हाय तेल क्षेत्राचा शोध होय. हे तेल क्षेत्र मुंबईच्या वायव्येस 176 किमी. अंतरावर उथळ पाण्यातील भागात आहे.

येथे पाणी सु. ७५ ते ९० मी. खोल आहे. बॉंबे हाय क्षेत्रातील खणलेल्या पहिल्या विहिरीत मे १९७४ मध्ये तेल लागले. या तेल क्षेत्राची संरचना घुमटाकार आहे. या क्षेत्रातून पाईपलाईनद्वारे नैसर्गिक वायू उरण येथे आणून साठवला जातो.