ब्रह्मगिरी किल्ला

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट किल्ला ब्रह्मगिरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात असलेला एक किल्ला आहे. उंची समुद्रसपाटीपासून १२९४ मीटर / ४२४६ फ़ूट.

मार्ग

त्र्यंबकेश्वरापासून गंगावर्तकडे जाणाऱ्या ज्या पायऱ्या सुरू होतात, त्या पायऱ्यांनी वर चढताना पंधरा मिनिटानंतर डावीकडे ब्रह्मगिरीला जाणारी वाट दिसते. या ठिकाणी दिशादर्शक फलकही आहे. साधारणतः वीस मिनिटे चालल्यावर त्र्यंबकेश्वराच्या कुशावर्ताकडून येणाऱ्या बांधीव पायऱ्यांपाशी आपण पोहोचतो. त्यांवरून चढत चढत कड्यापाशी पोहोचायचे. तिथून कड्यावर चढण्यासाठी खोदलेल्या पायऱ्यांनी सुमारे दीड तासात ब्रह्मगिरीगडावर पोहोचता येते.

इतिहास

या किल्ल्याचा उल्लेख यादव काळापासून झालेला आढळतो. सम्राट रामचंद्रदेव यादव यांनी हा किल्ला जिंकला होता. पुढे इ.स. १६२९ मध्ये शहाजीराजांनी जिंकला. पुढे इ.स. १६७० मध्ये सातमाळा रांगेतील कांचनाच्या खिंडीत छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाउद खानाचा पराभव केला आणि या संपूर्ण भागावर वचक बसवला. त्याच वर्षी मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला आणि परिसर मराठी राज्यात सामील करून घेतला. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी सर्व मराठी मुलुख घेताना हा किल्ला सुद्धा घेतला.

गडावरील परिसर

गडावर फारशी सपाटी नाही. उजवीकडे चढून गेल्यावर 'गोदातीर्थ' नावाचे कुंड लागते. हे गोदावरीचे आदिम उगमस्थान मानले जाते. कुंडाजवळ एक शंकराचे मंदिर आहे. काही ठिकाणी तटबंदी आणि बुरुजांचे अवशेष सापडतात.

संदर्भ

हे सुद्धा पहा

साचा:विस्तार-किल्ला साचा:महाराष्ट्रातील किल्ले (विभागवार) साचा:महाराष्ट्रातील किल्ले