भरूच

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट शहर भरूच (गुजराती: ભરૂચ) हे भारताच्या गुजरात राज्यामधील एक शहर व भरूच जिल्ह्याचे मुख्यालय आहे. भरूच शहर गुजरातच्या दक्षिण भागात नर्मदा नदीच्या उत्तर काठावर वसले असूने ते राजधानी गांधीनगरपासून २१० किमी तर सुरतहून ७० किमी अंतरावर स्थित आहे. २०११ साली भरूचची लोकसंख्या १.६९ लाख इतकी होती. अंकलेश्वर हे भरूच जिल्ह्यामधील दुसरे शहर नर्मदेच्या दक्षिण काठावर वसले असून ही दोन शहरे १८८१ साली बांधण्यात आलेल्या ब्रिटिशकालीन पुलाद्वारे जोडली गेली.

भरूच राष्ट्रीय महामार्ग ८ वर स्थित असून ते पश्चिम रेल्वेवरील एक स्थानक आहे. भरूच भागाचे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झाले असून येथे सध्या अनेक मोठ्या कंपन्यांचे कारखाने व कार्यालये आहेत.

बाह्य दुवे

साचा:कॉमन्स वर्ग