भाकरा नांगल धरण

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट धरण

Pt. Jawaharlal Nehru with group of engineers who constructed Bhakra Dam 03

भाकरा नांगल धरण हा एक बहु उद्देशीय प्रकल्प आहे, तो पंजाब आणि हिमाचल प्रदेश यांच्या सीमेवर बांधला गेला आहे. सतलज नदीवर असलेले भाकरा धरण पंजाब आणि हिमाचल प्रदेशला पाणी पुरवठा करते. याच धरणाचे पाणी वापरून दिल्ली, चंदिगडसह उत्तर भारतातील बऱ्याच मोठ्या भूप्रदेशाला वीज पुरवठा केला जातो. हिमाचल प्रदेशातील भाकरा नांगल धरण हे भूकंपप्रवण क्षेत्रात येते. या भागाच्या पाहणीत हे लक्षात आल्यावर धरण बांधताना हार्वे स्लोकम या स्थापत्यशास्त्रज्ञाने त्या भागातील फुटके-तुटके खडक व माती बाजूला करून तेथे लाखो टन कॉंक्रीटची भर घातली व मगच धरण बांधले. साचा:विस्तार साचा:पंजाब - जिल्हे