Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
भाजे लेणी - मराठीपिडिया Jump to content

भाजे लेणी

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
भाजे लेणी, क्र १२

भाजे लेणी महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील गावानजीकच्या भाजे गावाजवळील डोंगरातील प्राचीन बौद्ध लेणी आहेत. येथील चैत्यगृह महत्त्वपूर्ण आहे. बाजूला भिक्खूंना राहण्यांसाठी खोल्या आढळतात. या लेण्यांना २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[]

येथे २२ लेणी आढळतात. एक चैत्यगृह व २१ विहार आहेत. या लेणी मुळे महाराष्ट्र राज्याला खूप पर्यटक मिळतात . येथे रोज एक लाख ते दोन लाख पर्यटक येतात

कलात्मक आविष्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

येथे चैत्य गवाक्षांच्या माळा आहेत. त्यांना लागून कोरीव सज्जे बनवलेले आहेत. यातील काही सज्जांवर कोरीव कामातून जाळी आणि पडद्याचा भास निर्माण केलेला आहे. वेदिकापट्टीवर नक्षीदार कोरीव काम आहे. दगडात कोरून काढलेल्या कड्या आहेत. या ठिकाणी गवाक्षातून युगुले कोरलेलीही दिसून येतात. तसेच येथे एक यक्षिणी कोरलेली आहे. या यक्षिणीच्या हातात धरलेले झाड आजही स्पष्ट दिसते.

कातळात एक चैत्यकमान कोरली आहे. या कमानीला एकूण १७२ छिद्रे पाडलेली आहेत.

येथील चैत्य सुमारे १७ मीटर लांब, ८ मीटर रुंद आणि तितकेच मीटर उंच आहे. त्यात सत्तावीस अष्टकोनी खांब आणि मधोमध स्तूप आहे. या खांबांवर कमळ, चक्र अशी चिन्हेही कोरलेली आहेत. एका ठिकाणी एक खुंटी आणि तिला अडकवलेला फुलांचा हार कोरलेला आहे.

स्तूपापाठीमागील खांबांवर बुद्धाची पुसटशी चित्रे दिसून येतात.

चैत्यगृहाला लाकडी तुळयांचे छत आहे. या तुळयांवर ब्राह्मी लिपीतील लेख आहेत.

निर्माण[संपादन | स्रोत संपादित करा]

इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात भाजे लेणी कोरण्यास सुरुवात झाली असे मानले जाते. त्यानंतर आठशे वर्षे म्हणजेच इसवी सन सहाव्या शतकापर्यंत लेणी निर्मितीची प्रक्रिया सुरू होती. जनतेच्या दानातून येथील विहार उभे राहिले आहेत व त्यांच्या दानाचे लेख तेथे दिसून येतात. चैत्यगृहाच्या दक्षिण दिशेस स्वच्छ पाण्याचा स्रोत आहे.

सूर्यलेणे[संपादन | स्रोत संपादित करा]

येथील सूर्यलेणे प्रसिद्ध आहे. या लेण्यात पौराणिक प्रसंगांचे पट, सालंकृत-शस्त्रधारी द्वारपाल, वन्यप्राण्यांचे थर आणि चैत्य-स्तूपांचे नक्षीकाम कोरलेले आहे. यात सूर्य आणि इंद्राचा मानला जाणारा देखावा आहे. या पहिल्या शिल्पात चार घोडय़ांच्या रथावर सूर्य स्वार होऊन चालला आहे, रथात त्याच्या मागे-पुढे त्याची पत्नी अथवा दासी आहे. त्यातील एकीने वर छत्र धरले आहे तर दुसरी चामर ढाळते आहे. त्यांच्या या रथाखाली काही असुर तुडवले जात आहेत. अनेकांच्या मते ही सूर्यदेवता, रथातील त्या दोघी त्याच्या पत्नी संज्ञा आणि छाया तर रथाखाली तुडवला जाणारा तो सूर्याचा शत्रू राहू आहे. एका मतानुसार रथारूढ असणारे हे शिल्प शक्राचे आहे. तर काहींना यामध्ये ग्रीकांच्या हेलिओस किंवा रोमनांच्या अपोलो देवतेचा भास होतो.

सांगितिक महत्त्व[संपादन | स्रोत संपादित करा]

भारतीय संगीत कला संदर्भात हे लेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण येथे कोरलेल्या चित्रात एक तबला वाजवणारी स्त्री दिसते आहे. या शिवाय एक नर्तकी नृत्य करतांना येथे दिसत आहे. या कोरीव कामाने तबला हे वाद्य निश्चितपणे भारतात निर्माण झाले व किमान दोन हजार वर्षांपासून वापरात आहे हे निर्विवादपणे सिद्ध होते.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
कोरलेल्या चित्रात एक तबला वाजवणारी स्त्री

तसेच भारतीय नृत्य परंपरा ही किमान दोन हजार वर्षे पुरातन आहे याचा पुरावा ही दिसून येतो. तबला वादनाचे हे आदिम प्राचीन लेणे पाहण्यासाठी अनेक तबला वादक भाजे लेणी अगत्याने हजेरी लावतात.लेणी हा भारतातील पुणे शहरात स्थित बीसी 2च्या शतकातील 22 [2] रॉक-कट लेण्यांचा समूह आहे . लेणी Bhajaच्या गावात वरील 400 फूट आहे, [3] पासून कार्यरत एक महत्त्वाचा प्राचीन व्यापारी मार्गावर अरबी समुद्र मध्ये पूर्व दरवाजावर डेक्कन पठार (दरम्यान विभागणी उत्तर भारत आणि दक्षिण भारत ). [4] शिलालेख आणि गुहा मंदिर राष्ट्रीय महत्त्व स्मारक म्हणून संरक्षित आहे, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण द्वारे अधिसूचना क्रमांक 2407-A द्वारे. [5] [6] हे हिनायनाचे आहेमहाराष्ट्रातील बौद्ध पंथ. [2] लेण्यांमध्ये अनेक स्तूप आहेत , जे त्यांच्या लक्षणीय वैशिष्ट्यांपैकी एक आहे. सर्वात ठळक उत्खनन म्हणजे त्याची चैत्य (किंवा चैत्यगृह - गुहा XII), लाकडी आर्किटेक्चरमधून या स्वरूपाच्या सुरुवातीच्या विकासाचे एक चांगले उदाहरण, एक घुमटाकार घोड्याची नाल असलेली छत. त्याच्या विहारात (गुहा XVIII) समोर एक स्तंभित व्हरांडा आहे आणि अनन्य आरामाने सुशोभित आहे. [7] लाकडी वास्तुकलेच्या जागरुकतेच्या संकेतांसाठी या लेण्या उल्लेखनीय आहेत. [2] कोरीव काम सिद्ध करतात की तबला - एक तालवाद्य वाद्य - भारतात किमान 2300 वर्षे वापरला गेला होता , [8] [9]तबल्याची ओळख भारताबाहेरून किंवा तुर्को-अरब लोकांकडून केली गेली असा शतकानुशतकांचा विश्वास नाकारत आहे. [१०] कोरीव काम करताना एक स्त्री तबला व दुसरी स्त्री नृत्य करत असल्याचे दाखवते .

चित्रदालन[संपादन | स्रोत संपादित करा]

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:विस्तार साचा:भारतीय बौद्ध लेणी साचा:महाराष्ट्रातील लेणी