भानुदास
Appearance
संत भानुदास (शके १३७० ते १४३५) हे वारकरी संप्रदायातील महान संत होते. त्यानी विजयनगरला नेलेली पंढरपुरातीलविठ्ठलमूर्ती परत आणली. हे प्रसिद्ध संत एकनाथ महाराजांचे पणजोबा होते. [१] लहानपणी त्यांनी सूर्याची पूजा केली, पण नंतर त्यांनी विठोबाची पूजा केली. [२] भक्तविजयमध्ये त्यांचे दोन अध्याय आहेत. [३] पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातील सोळखांबी मंडपात (प्रवेशद्वाराजवळ, उजवी बाजू) येथे त्यांची समाधी आहे.
संत भानुदासांवरची मराठी पुस्तके[संपादन | स्रोत संपादित करा]
- देव आले पंढरीला (संत भानुदासांवरची कादंबरी, लेखक - अशोक देशपांडे))
- संत भानुदास (नाटक, लेखक - न.चिं. केळकर)