भायखळा रेल्वे स्थानक

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:बदल साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक

भायखळा स्टेशनवरील माहितीचित्र


भायखळा हे मुंबई उपनगरीय रेल्वेचे सेंट्रल लाईनवरील रेल्वे स्टेशन आहे. ते भायखळाच्या परिसरात आहे. सर्व जलद गाड्या गर्दीचे तास असो किंवा इतर कोणतीही वेळ असो, या स्टेशनवर थांबा घेतातच!

भायखळा रेल्वे स्टेशनचा फलाट

शब्देतिहास

भायखळा हे नाव भाय (बाबाजी) आणि खळा (धान्य साठविण्याची जागा) यावरून पडले असावे. [१]

एप्रिल 1853 मध्ये मुंबई-ठाणे रेल्वेचे उद्घाटन झाले तेव्हा भायखळा हे मूळ स्टेशन्सपैकी एक होते. 1857 मध्ये या स्टेशनने वर्तमान स्वरूप घेतले पण तत्पूर्वी वर्षभरापूर्वीच ते लाकडी संरचनेच्या रूपात बांधले गेले होते. [२] त्यामुळे या स्टेशनची सध्याची इमारत ही भारतातील सर्वात जुन्या स्टेशनची इमारत ठरते.

मुंबईचे पहिले रेल्वे इंजिन भायखळा मार्गे मुंबईमध्ये आणण्यात आले आणि सुमारे 200 मजुरांनी ते ओढत आणले होते. [१]