भारतीय द्रुतगती रेल्वे महामंडळ मर्यादित

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट कंपनी भारतीय द्रुतगती रेल्वे महामंडळ मर्यादित ही एक विशिष्ट प्रयोजन महामंडळ आहे जी २०१२ मध्ये भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील रेल विकास निगम लिमिटेडची अनुषंगी कंपनी म्हणून समाविष्ट केली गेली आहे. एया कंपनीची भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयांतर्गत भारतात द्रुतगती रेल्वेमार्गाचा विकास आणि अंमलबजावणी करण्यासाठी स्थापना करण्यात आली आहे.

प्रकल्प

मुंबई - अहमदाबाद द्रुतगती रेल्वेमार्ग

राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळ मर्यादित या मार्गाची अंमलबजावणी करीत आहे आणि बांधकाम एप्रिल २०२० पर्यंत सुरू होण्याची शक्यता असून प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. रेल्वेमार्गाच्या चलसांचासाठी जपान रेलवे शिन्कानसेन ई ५ मालिका इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट वापरेल.

हीरक चतुर्भुज

२०२० पर्यंत हीरक चतुर्भुज मार्गांच्या व्यवहार्यतेच्या अभ्यासासाठी कंत्राट देण्यात आले आहेत. यात ३ टप्पे असतील:[१]

  • दिल्ली-मुंबई
  • मुंबई-चेन्नई
  • दिल्ली-कोलकाता

दिल्ली - चंदीगड - अमृतसर द्रुतगती रेल्वेमार्ग

या द्रुतगती रेल्वेमार्गाचा पूर्व-व्यवहार्यता अभ्यास सुरू आहे. अंतरिम अहवाल २०१५ मध्ये सिस्ट्राने सादर केला होता.[२]

दिल्ली - चेन्नई द्रुतगती रेल्वेमार्ग

या मार्गाचे २ टप्पे असतील. पहिल्या टप्प्यात, दिल्ली-नागपूर विभागाच्या व्यवहार्यतेचा अभ्यास सुरू आहे.[३]

हे सुद्धा पहा

संदर्भ

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे