भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद
साचा:माहितीचौकट संघटना इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च(आयसीएमआर) किंवा अन्य नाव - भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद ही भारतामध्ये वैद्यकशास्त्रातील संशोधन आणि सहयोगाला उत्तेजन देणारी संस्था आहे. या संस्थेचा आर्थिक खर्च भारत सरकारतर्फे होतो.[१][२]
IRFA (Indian Research Fund Association)ची स्थापना १९११ साली झाली. १९४९ साली तिचे नाव बदलून ICMR असे झाले.
मुख्यालय : दिल्ली
कोरोनाच्या लसीसाठी दमदाटी[संपादन | स्रोत संपादित करा]
१५ ऑगस्ट २०२० च्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर करोना रोखणारी स्वदेशी लस निर्माण व्हायलाच हवी हा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा आग्रह आहे. या पूर्णपणे विज्ञानदुष्ट दावा करणारी देशाची आघाडीची केंद्रीय विज्ञान संशोधन संस्था लसनिर्मितीसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या, जोखमीच्या आणि ज्यात प्रत्येक पावलावर सावध राहणे आवश्यक असते अशा घटकाच्या निर्मितीचा मुहूर्त कसा काय काढू शकते, हा प्रश्न उरतोच. तो भीतिदायक म्हणायला हवा.
याचे कारण असे की, या संस्थेचे संचालक बलराम भार्गव यांनी देशातील प्रमुख १२ वैद्यकीय संस्थांना पत्र लिहून १५ ऑगस्टचा लसनिर्मितीचा मुहूर्त गाठणे किती आवश्यक आहे, असे दटावल्याचे उघड झाले.