भुरी बाई

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट व्यक्ती भुरी बाई (नामभेद: भूरी बाई) ह्या एक भारतीय भिल्ल कलाकार आहेत. झाबुआ जिल्हा, मध्य प्रदेश येथील पिटोला गावात जन्मलेल्या भुरी बाई ह्या भारतातील सर्वात मोठा आदिवासी गट भिल्ल समाजाच्या आहेत. त्यांनी मध्य प्रदेश सरकारच्या सर्वोच्च पुरस्कार शिखर सन्मान सह अनेक पुरस्कार जिंकले आहेत.[१] त्यांना इ.स. २०२१ मध्ये भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देण्यात आला.[२][३]

प्रारंभिक जीवन

पिटोलाच्या भुरीबाई त्यांच्या चित्रांसाठी कागद आणि कॅनव्हास वापरणाऱ्या पहिल्या भिल्ल कलाकार आहेत. भारत भवनचे तत्कालीन संचालक जगदीश स्वामीनाथन यांनी त्यांना कागदावर चित्र काढण्यास सांगितले.[४] अशा प्रकारे भुरीबाईंनी भिल्ल कलाकार म्हणून आपला प्रवास सुरू केला. त्या दिवशी भुरीबाईंनी त्यांच्या कुटुंबाचा वडिलोपार्जित घोडा चितारला आणि श्वेतपत्रिकेवर पोस्टर पेंटचा अद्भुत परिणाम झाला. हे पाहून त्यांना खूप आनंद झाला. याबद्दल त्यांनी आपला अनुभव पुढील प्रमाणे व्यक्त केला,

“गावाकडे आम्हाला झाडांपासून आणि ओल्या मातीतून रंग काढण्यासाठी खूप मेहनत करावी लागत असे. परंतु इथे मात्र मला रंगांच्या अनेक छटा आणि तयार ब्रश देण्यात आला."

[५] सुरुवातीला भुरीबाईंना बसून चित्र रंगवताना जरा अवघडल्या सारखे वाटले. पण चित्रकलेच्या जादूने त्यांना चांगलेच वेड लावले आणि त्या या आधुनिक पद्धतीने चित्र काढण्यात सरावल्या.

भूरीबाई आता भोपाळमधील आदिवासी लोककला अकादमी मध्ये कलाकार म्हणून काम करतात. त्यांना मध्य प्रदेश सरकारकडून तेथील सर्वोच्च पुरस्कार शिखर सन्मान (१९८६ - ८७) मिळाला. तर इ.स. १९९८ मध्ये मध्य प्रदेश सरकारने त्यांना अहिल्या सन्मानाने सन्मानित केले. तर इ.स. २०२१ मध्ये भारत सरकार तर्फे पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला..[६][७]

भुरीबाई सांगतात की प्रत्येक वेळी जेव्हा ती चित्रकला सुरू करते, ती तिचे लक्ष भिल्ल जीवन आणि संस्कृतीच्या विविध पैलूंवर केंद्रित करते आणि जेव्हा एखादी विशिष्ट संकल्पना त्यांना सुचते, तेव्हा त्या ती संकल्पना कॅनव्हासवर उतरवतात. त्यांच्या चित्रांमध्ये जंगलातील प्राणी, जंगल आणि झाडी झुडपे तसेच गाटला (स्मारक स्तंभ), भिल्ल देवता, वेशभूषा, दागिने आणि गोंदण (टॅटू), झोपड्या आणि धान्य, टोप्या, सण आणि नृत्य आणि मौखिक कथांसह भिल्ल समाजाच्या जीवनातील प्रत्येक पैलू समाविष्ट आहेत. भूरीबाईंनी अलीकडेच झाडे आणि प्राणी तसेच विमान, दूरदर्शन, कार आणि बसची चित्रे सुद्धा काढण्यास सुरुवात केली आहे. मध्य प्रदेशातील झाबुआ येथील ती पहिली भिल्ल आदिवासी महिला कलाकार आहे, जीने गावच्या झोपड्यांच्या भिंतींच्या पलीकडे थोडी सुधारणा करून पारंपारिक पिथोरा चित्रे काढण्याचे धाडस केले. त्यांनी त्यांची लोक-कला मातीच्या भिंतींपासून विशाल कॅनव्हास आणि कागदावर हस्तांतरित केली.[८]

भुरी बाईना एकूण सहा मुले आहेत. त्यांनी आपल्या मुलांनासुद्धा आपली कला शिकवली आहे. पैकी त्यांच्या दोन मुली, धाकटा मुलगा आणि सून या कलेचा सराव करतात.[९]

प्रदर्शन

  • २०१७ सतरंगी: भिल आर्ट, ओजस कला, दिल्ली[१०]
  • २०१७ "गिविंग पॉवर: ट्रेडिशन से कंटेम्परेरी तक", ब्लूप्रिंट 21 + एक्ज़िबिट 320, दिल्ली.
  • २०१० - २०११ ""वर्नैक्यलर , इन द कंटेम्परेरी", देवी कला फाउंडेशन, बंगळुरू.
  • २०१० अदर मास्टर्स ऑफ इंडिया", मुसी डू क्वाई ब्रांली, पेरिस
  • २००९ "नाउ द ट्रीज हॅव्ह स्पोकन", पुंडोले गॅलरी, मुंबई
  • २००८ "फ्रीडम", आंतरराष्ट्रीय आधुनिक कला केंद्र (CIMA), कोलकाता.

संदर्भ

साचा:संदर्भयादी