मंगळागौर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते. यासाठी अशाच इतर नवविवाहितांनाही बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात व त्यानंतर रात्री जागरण करतात. जागरणाच्या वेळी, विविध खेळ खेळण्याचा प्रघात आहे. खेळांमध्ये परंपरागत चालत आलेली गाणीही म्हणतात - लाट्या बाई लाट्या सारंगी लाट्या, अठूडं केलं गठूडं केलं आदी गाणे म्हणण्यात येतात. नऊवारी लुगडे नेसून व नाकात नथ, पारंपरिक दागिने घालून हे व्रत करण्यात येते .[१]

मंगळागौर पूजा

पूजा

सकाळी स्नान करून पूजा करण्यात येते.त्यात मंगळागौर म्हणजे पार्वतीची धातूची मूर्ती (बहुधा, अन्नपूर्णा या पार्वतीच्या रूपाची) मांडण्यात येते. शेजारी महादेवाची पिंडही ठेवतात.मंगळागौरीची षोडषोपचारपूजा करतात. मग आरती करून प्रसाद वाटला जातो. त्यानंतर पूजेसाठी आलेल्या सवाष्णींचे भोजन होते. श्री शिव आणि पार्वती हे आदर्श गृहस्थाश्रमाचे उदाहरण मानले जाते. या पूजाप्रसंगी शक्तीतत्त्वाची आराधना करावी. माता,विद्या,बुद्धी, धृती, शक्तीरूपात राहणा-या देवीची उपासना करावी व तिचे दैवी गुण स्वतःमध्ये यावेत अशी प्रार्थना करावी.नवविवाहित मुली श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीचे पूजन करतात. 'गौरी गौरी सौभाग्य दे ' अशी प्रार्थना करतात .सामूहिकरीत्या ही पूजा करण्यात विशेष आनंद मिळतो . कारण या निमित्ताने मैत्रिणी बहिणी सगळ्या एकत्र येतात्त .ही पूजा केल्यावर मौनाने भोजन करायचे असते . हा संयमाचा पाठ खूप महत्त्वाचा आहे.हा पर्यावरण रक्षणाचा पाठ समजावा. हे पंचवार्षिक व्रत उद्यापनाने पूर्ण होते. मुलींनी आई-वडिलांना या निमित्ताने वाण द्यायचे असते. माहेरील ज्येष्ठ नात्यांचा आदर करणे या वेळी योग्य ठरले. तसेच मंगळागौरीच्या निमित्ताने फक्त परस्परांना भेटवस्तू देण्यापेक्षा या रकमेतून आवश्यक धन किंवा धान्य इ. सामाजिक संस्थांना द्यावे हे फारच चांगले. [२]

पत्री पूजा

वेगवेगळ्या झाडांच्या पत्री (पाने) व फुले या पूजेत वापरली जातात. ही झाडे औषधीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची म्हणून आयुर्वेदात मानली गेली आहेत अर्जुनसादडा, आघाडा, कण्हेर, चमेली, जाई, डाळिंब, डोरली, तुळस, दुर्वा, धोत्रा, बेल, बोर, माका, मोगरा, रुई, विष्णूक्रांता, शमी, शेवंती वगैरे झाडांची पाने या कामाला येतात.. पूजा करतांना १६ प्रकारच्या पत्री वहाव्यात असा समज आहे.साचा:संदर्भ हवा.पूर्वी भारतात आयुर्वेदाचा प्रसार होता. या पूजेच्या निमित्ताने सर्व प्रकारच्या औषधी झाडांची नव्या विवाहितेस ओळख व्हावी व पुढील आयुष्यात गरज पडल्यास ते झाड पटकन ओळखता यावे अशी पत्रीपूजेमागची भावना असू शकतेसाचा:संदर्भ हवा

चित्र:मंगळागौर.ogg

मंगळागौरीच्या वेळी खेळण्यात येणारे खेळ

वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासू-सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा - इत्यादी. असे साधारणतः ११० प्रकारचे खेळ यात खेळले जातात.यात सुमारे २१ प्रकारच्या फुगड्या, ६ प्रकार आगोटा पागोट्याचे असतात.[३]

या सर्व खेळ प्रकारांमुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो हा हे खेळ खेळण्याचा मुख्य उपयोग सांगता येईल. पूर्वीच्या काळी केवळ घरातील कामे करणा-या महिलांना या खेळातून आनंदही मिळे. हे खेळ खेळताना महिला त्याजोडीने गाणीही म्हणतात.मंगळागौर हे व्रत कष्टाचे, दमणुकीचे नसून चापल्य देणारे, चैतन्य देणारे व सामुहिक जीवनाचा आनंद देणारे आहे. हे लक्षात घ्यावे. देवीला वाहण्यात येणाऱ्या २१ प्रकारच्या औषधी वनस्पतींची (पत्री) माहिती करून घ्यावी. [४]

संदर्भ

साचा:संदर्भयादी

  1. लोकमत नागपूर- ई - पेपर- दिनांक ११-८-२०१३ पान क्र. ८]
  2. लेखक - य . शं . लेले -विवेक -२६ ऑगस्ट २००७
  3. लोकमत नागपूर- ई - पेपर- दिनांक ११-८-२०१३ पान क्र. ८
  4. लेखक- य.शं लेले -विवेक २६ ऑगस्ट २००७