मंचिर्याल

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:About साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र मंचिर्याल (Mancherial) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या मंचिर्याल जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हे गोदावरी नदीच्या उत्तर तीरावर आहे. हे राज्याची राजधानी हैदराबादपासून सुमारे २४४ किलोमीटर (१५२ मैल), करीमनगरपासून ८४ किलोमीटर (५२ मैल) आणि आदिलाबादपासून १५५ किलोमीटर (९६ मैल) अंतरावर आहे. मंचिर्याल जिल्हा हा पूर्वीच्या आदिलाबाद जिल्ह्यापासून बनलेला आहे.

तेलंगणा सरकारने सिंगरेनी कॉलीअरीज कंपनीची स्थापना करून कोळशाच्या खाणीतून कोळसा निर्मितीस सुरुवात केल्यानंतर प्रदेशात औद्योगिकीकरण झाले. १९७० च्या दशकात येथे एक औद्योगिक प्रशिक्षण संस्था देखील उघडण्यात आली.[१]

लोकसंख्या

२०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या ८७,१५३ होती. सरासरी साक्षरता दर ७५.७१% होता.[२]

परिसरातील बहुसंख्य लोक हिंदू धर्म पालन करतात, त्यानंतर इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माचे. तेलुगू ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे.

भुगोल

मंचिर्याल हे उत्तर अक्षांशाच्या १८°५२′४.३५″N आणि पूर्व रेखांशाच्या ७९°२७′५०.१८″E वर स्थित आहे. हे गोदावरी नदीच्या उत्तर तीरावर आहे. हे गोदावरी नदीच्या उत्तर सीमेवर वसलेले आहे. मंचिर्यालची सरासरी उंची १५४ मीटर आहे.[३] वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०७४.९ मिलिमीटर (४२.३२ इंच) आहे.[४]

प्रशासन

मंचिर्याल नगरपालिका ही शहराच्या नागरी गरजांवर देखरेख करणारी नागरी संस्था आहे. सध्या नगरपालिकेचे कार्यक्षेत्र २८.०८ चौ.कि.मी. (१०.८४ चौरस मैल) मध्ये पसरलेले असून ३४ प्रभाग आहेत.[५][६] मंचिर्याल हे शहर मंचिर्याल विधानसभा मतदारसंघात येते. जो पेद्दपल्ली लोकसभा मतदारसंघात मोडतो.

वाहतुक

मंचिर्याल येथे TSRTC (तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ)चे बसस्थानक आहे आणि सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरवते.

शिक्षण

महाविद्यालये

  • शासकीय आयटीआय महाविद्यालय, मंचिर्याल
  • शासकीय पदवी महाविद्यालय, मंचिर्याल
  • शासकीय कनिष्ठ महाविद्यालय, मंचिर्याल

हे देखाल पहा

संदर्भ

साचा:संदर्भयादी