Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
मलंगगड - मराठीपिडिया Jump to content

मलंगगड

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट किल्ला

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
मलंगगड

मलंगगड महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे.

मलंगगड हे धार्मिक स्थान श्री मछिद्रनाथ या नावाने ओळखले जाते. मलंगगड हा किल्ला शिलाहार राजाने बांधला. येथे मच्छिंद्रनाथांचे पुरातन मंदिर आहे याच मंदिरातील मच्छिंद्रनाथ यांच्या समाधीआहे. येथील मलंग मच्छिंद्रनाथ समाधीची यात्रा माघ पौर्णिमेला असते. या यात्रेत नाथांची पालखी निघते. या पालखीवर ॐकार आहे व नाथ संप्रदायाची चिन्हे आहेत. या स्थानाचा मालकी वाद हा मुंबई उच्च न्यायालयात असून त्या ठिकाणी हिंदू पक्षकार म्हणून प्रसिद्ध इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे हे पाहत आहेत. दर पौर्णिमेला या समाधीची आरती होते व समाधीवर भगवे वस्त्र अर्पण केले जाते. या समाधीच्या पूजेचा मान आजही केतकर या हिंदू ब्राम्हण घराण्याकडे आहे. श्री मलंग गड मुसलमानांचे नव्हे, हिंदूंचे श्रद्धास्थान! काय आहे इतिहास? श्री मलंग गडावर नाथपंथाची दीक्षा गादी आहे, तशी पेशवेकालीन इतिहासात नोंद आहे. या मुख्य स्थानापासून अलीकडे जालिंदरनाथ आणि कानिफनाथ यांच्या समाधी आहेत. याच गडावर नाथपंथीयांचे श्री मच्छिन्द्रनाथ आणि गोरक्षनाथ यांचे मंदिर आहे. तसेच अन्य ५ नाथांच्याही समाधी आहेत. याच गडावर श्री गणेश, श्री हनुमान आणि देवीचेही मंदिर आहे.

महाराष्ट्रातील सर्वसामान्यांमध्ये श्री मलंग गडाचा इतिहास काय आहे, हे श्रद्धास्थान नक्की हिंदूंचे कि मुसलमानांचे? अशी जिज्ञासा निर्माण झाली. शेकडो जणांनी सोशल मीडियाद्वारे आमच्याकडे याचा नक्की इतिहास काय, अशी विचारणा केली. त्यामुळे आम्ही खास वाचकांसाठी श्री मलंग गडाचा नक्की इतिहास काय, त्याविषयीचा वाद काय हे जाणून घेतले.

श्री मलंग गडाचा काय आहे इतिहास? श्री मलंग गडावर नाथपंथाची दीक्षा गादी आहे. तेथे हिंदू धर्मीय दर्शनासाठी जातात, होळी पौर्णिमेला आरती करतात या मुख्य स्थानापासून अलीकडे दोन समाधी आहेत. त्या जालिंदरनाथ आणि कानिफनाथ यांच्या आहेत. तर याच गडावर नाथपंथाचे श्री मच्छिन्द्रनाथ आणि गोरक्षनाथ यांचे मंदिर आहे, तसेच अन्य ५ नाथांची समाधीही आहे. याच गडावर श्री गणेश, श्री हनुमान आणि देवीचे मंदिरही आहे. सध्या ही दीक्षा गादी आणि दोन समाधी स्थळे यांवर मुसलमानांनी अतिक्रमण केले आहे. पेशव्यांनी या ठिकणी पूजापाठ करण्याचा मान कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण केतकर घराण्याकडे दिला. पूर्वापार पिढ्यानपिढ्या हा वारसा केतकर घराण्याच्या पुढच्या पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत आहे. आजही या ठिकाणी सर्व धार्मिक विधी हिंदू धर्माप्रमाणे होतात. धर्मवीर स्व. आनंद दिघे यांनाही याच दीक्षा गादी येथे नाथपंथाची दीक्षा देण्यात आली. तेव्हापासून धर्मवीर स्व. आनंद दिघे हेही होळी पौर्णिमेला श्री मलंग गडावर आरतीसाठी येत असत. ठाणे जिल्ह्यात नवनाथ पंथाचा प्रभाव जास्त होता. नाथपंथाच्या हिंदू संन्याशाला मलंग म्हणण्याची पद्धत आहे. म्हणून त्याला श्री मलंग गड म्हटले आहे. मुसलमानांनी त्याला हाजी मलंग म्हणायला सुरुवात केली. ‘हाजी’ हा शब्द या देवस्थानाच्या ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये कुठेही आढळून येत नाही. ‘मलंग’ या शब्दाचा उल्लेख सापडतो. मधल्या काळात मुसलमानांनी या देवस्थानावर वर्चस्व गाजवण्यासाठी धाकदपटशहा सुरू केला आणि त्या देवस्थानाचे दर्ग्यात रूपांतर केले. तेव्हापासून मुसलमानही त्यावर दावा करतात. परंतु तेथील सर्व धार्मिक विधी ह्या हिंदू पद्धतीने होत असतात, त्यासाठी तेथे पूजा करण्याचा मान कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण केतकर घराण्याकडे आहे, पूर्वापार पिढ्यान पिढ्या हा वारसा केतकर घराण्याच्या पुढच्या पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत आहे. ते जर मुसलमानांचे स्थान असते, तर तिथे हिंदू पुजारी कसे? धार्मिक विधी हिंदू धर्माप्रमाणे कसे होतात? – पांडुरंग बेलकवडे, इतिहास संशोधक

काय आहे वाद? या देवस्थानावर मागील शतकापासून मुसलमानानी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे सध्या यावर ठाणे स्थानिक न्यायालय, उच्च न्यायालयात आणि ठाणे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे दावे प्रलंबित आहेत. त्यामध्ये नासिर खान फाजल खान प्रतिवादी म्हणून दाखल आहेत.

काय आहे न्यायालयीन वाद? या प्रकरणात दाखल दावे ही नाथपंथाचे मदन बलकवडे हे पाहत आहेत. मदन बलकवडे यांच्या म्हणण्यानुसार श्री मलंग गडावरील देवस्थान हे नाथपंथियांची दीक्षा गादी आहे. या ठिकाणी हिंदू येतातच, तसेच मुसलमानही भक्तीभावाने येत आहेत म्हणून गोपाळ कृष्ण केतकर यांनी १९५२ साली याची नोंदणी ‘श्री पीर हाजी मलंग साहिब दर्गा’ या नावाने केली. पेशवेकालीन इतिहास श्री मलंग गडाची नोंद आहे. त्यामध्ये श्री मलंग बाबा अशी नोंद सापडते. मात्र कालांतराने या ठिकाणी मुसलमानांनी वर्चस्व दाखवणे सुरू केले. पूर्वापार हिंदू धर्म परंपरेने सुरू असलेल्या पूजाविधीवर मुसलमान आक्षेप घेऊ लागले, पुढे पुढे तर हिंदूंना या ठिकाणी येण्यास प्रतिबंध करू लागले. म्हणून मग हे देवस्थान मूलतः हिंदूंचेच आहे, असे सर्व ऐतिहासिक पुराव्यानिशी श्री अनंत गोखले यांनी १/१९८२ मध्ये ठाणे कोर्टात खटला दाखल केला आणि या देवस्थानाच्या ‘श्री पीर हाजी मलंग साहिब दर्गा’ या नोंदणीलाच आव्हान दिले आहे. हा खटला चालवू नये म्हणून नासिर खान फाजल खान यांनी उच्च न्यायालयात ६५०९/२००२ याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने त्यांना परत खाली ठाणे कोर्टात पाठवले, जिथे अनंत गोखले यांचा खटला सुरू आहे. हा खटला न्यायप्रविष्ट असतानाही नासिर खान फाजल खान यांनी या देवस्थानाची गैरमार्गाने वक्फ बोर्डात नोंदणी करून घेतली. त्याला मदन बलकवडे यांनी ही नोंदणी चुकीची आहे म्हणून त्याविरोधात उच्च न्यायालयात २००६/२००६ याचिका दाखल केली. त्यात उच्च न्यायालयाने नोव्हेंबर २००६ मध्ये वक्फ बोर्डाला या नोंदणीसाठी स्थगिती दिली. तसेच जोवर ठाणे कोर्टात प्रलंबित खटल्याचा निकाल लागत नाही, तोवर या देवस्थानाच्या कारभारात लक्ष घालण्यास पूर्ण मनाई केली. असे असूनही नासिर खान फाजल खान यांनी २००९मध्ये पुन्हा एकदा हे देवस्थान वक्फमध्ये रजिस्टर केले. वक्फनेही ते रजिस्टर करून त्याला प्रमाणपत्रही दिले. त्यावर मदन बलकवडे यांनी अवमान याचिका ५०८/२०१५ उच्च न्यायालयात दाखल केली. ती अजून उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशा प्रकारे सध्या उच्च न्यायालयात २००६/२००६ याचिका, १७१८ हा अर्ज आणि ५०८/२०१५ हे तीन दावे प्रलंबित आहेत. तसेच १/१९८२चा खटला ठाणे कोर्टात प्रलंबित आहे. तसेच २/२००९ हा अर्ज ठाणे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे प्रलंबित आहे. त्यामध्ये या देवस्थानावर विश्वस्त नेमण्याची मागणी केली आहे. हा अर्ज सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाने करण्यात आला आहे. त्या अर्जावर आजवर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. अशा प्रकारे या देवस्थानाविषयी अनेक खटले विविध ठिकाणी प्रलंबित असतानाही स्थानिक मुसलमान त्याला दाद देत नाहीत. विशेष म्हणजे धर्मादाय आयुक्तांकडे ज्यांच्या नावाने अर्ज प्रलंबित आहे, ते एकनाथ शिंदे राज्य सरकारमध्ये महत्त्वाचे मंत्री असूनही धर्मादाय आयुक्त या अर्जाची दखल घेऊन विश्वस्त नेमण्यास तयार नाही. श्री मलंग गडावर एक दीक्षा गादी आणि दोन समाधीस्थळ आहेत. ही हिंदूंची देवस्थाने आहेत हे सिद्ध करण्यासाठी सर्व इतिहासकालीन पुराव्यांसह खटले दाखल आहेत, जे प्रलंबित आहेत. परंतु यात प्रतिवादी नासिर खान फाजल खान यांना ते मुसलमानांचे श्रद्धास्थान आहेत हे सिद्ध करण्यासाठी कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. त्यांनी फक्त ब्रिटिश गॅझेटचा आधार करून हे स्थान मुसलमानांचे असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

स्थान[संपादन | स्रोत संपादित करा]

मलंगगड कल्याणपासून दक्षिणेस १६ कि.मी. अंतरावर एका उंच डोंगरावर बांधलेला आहे आणि तो पनवेल वरुण वावंजे गावपासून २ कि.मी.च्या अंतरावर आहे, बदलापूरच्या नैर्ऋत्येस व मुंबई आणि साष्टीच्या पूर्वेस हा किल्ला आहे. करंजा व उरण नैर्ऋत्येस आणि बोरघाट, भीमाशंकर व माळशेज घाट पूर्वेस असा हा भाग एकेकाळी लढाईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता.

इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

ॲबिंग्डन ह्या इंग्रजी अधिकाऱ्याने १७८० मध्ये मलंगगडाला वेढा घातला. पावसाळ्यात मराठे युद्ध टाळतात हे लक्षात घेऊन बेसावध मराठ्यांवर भर पावसातच हल्ला करण्याचे त्याने ठरवले. लढाई सुरू होताच नैर्ऋत्येच्या व उत्तरेकडच्या वाटा बंद करून टाकल्या. त्याने प्रथम पीरमाची घेण्याचे ठरवले. तेथे पांडुरंग केतकर यांस ३०० माणसांनिशी नेमलेले हाते. अचानक हल्ला झाल्यामुळे मराठ्यांनी प्रतिकार केला नाही. १२५ जण सोने माचीकडे धावले. तर बाकी गडावर जागा नव्हती म्हणून कल्याणच्या मामलेदाराकडे धावले. ॲबिंग्डनने गडावर पोहचण्यासाठी गडाच्या पायथ्यापासून पीर माचीपर्यंत वाट शोधून काढली. नाना फडणविसाने वेढा उठवण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. ॲबिंग्डनने पीर माचीच्या पठारावर तीन तोफा चढवल्या व सोने माचीवर गोळीबार चालू केला. पण प्रवेशद्वार मोठ्या खुबीने बांधले असल्यामुळे तेथवर गोळे पोहचेनात. मराठ्यांना जंगलातल्या अनेक चोरवाटा माहीत असल्यामुळे त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटण्याचा संभव नव्हता. किल्लेदाराने आनंदराव धुळप व काशीपंत यांच्याकडे मदत मागितली पण त्यांनी प्रत्यक्ष न येता ७०० शिपाई पाठवले जे तेथवर पोहचू शकले नाहीत. कॅप्टन ॲबिंग्डनने शिडा लावून २५० माणसे सोने माचीवर चढवली. पण मराठ्यांनी गडावरून दगडधोंड्यांचा वर्षाव करून त्यांना परत पाठवले. ॲबिग्डनने पीर माचीवरून तोफा काढून घेतल्या. गंगाधररावाने संधी साधून दाणापाणी व दारूगोळा भरून घेतला. नाना फडणीसांनी बाळाजी विश्वनाथ पाठक व राधो विश्वनाथ गोडबोले यांना सैन्य देऊन वेढा उठवण्यास पाठवले. त्यांच्या फौजा शिरवळ या मलंगच्या उत्तरेला असलेल्या गावी पोहचल्या. मराठांची फौज तीन हजारावर होती. त्यांनी शत्रूला हुसकावून लावण्याचे प्रयत्न केले पण ते अयशस्वी झाले. १६ सप्टेंबरला गारांची एक पलटण पीर माचीवर चाल करून गेली. त्यांनी तोफांवर हल्ले केल्यामुळे ब्रिटिशांनी घाईघाईने तोफा काढून घेतल्या.

मेजर वेस्टफॉलने ॲबिंग्डनच्या मदतीसाठी जादा कुमक धाडली. या सेनेने रसद घेऊन येणाऱ्या मराठांच्या तुकडीला उद्ध्वस्त केले. त्यामुळे मलंगगडावर अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला. काही धान्य पावसाने नासले, खजिना संपत आला. मराठ्यांनी इंग्रजांचेही दळणवळण तोडून टाकले होते. तेव्हा कर्नल हार्टलेने बेलापूर, पनवेल, तळोजे मार्ग सुरक्षित केला. शिरवळच्या मराठ्यांच्या तळावर हल्ला करून त्यांना हुसकावून लावले.

आता ब्रिटिशांनी कॅप्टन कारपेंटरच्या हुकमतीत मलंगगडावर दुसरा हल्ला चढवला. तोफांचा भडिमार सुरू केला. तटाला भगदाड पडले की आत घुसायला ३५० सैनिक तयार ठेवले होते पण केतकरांनी किल्ला शौर्याने लढवला. इंग्रजांचे बरेच सैनिक कामी आले. तेव्हा इंग्रजांनी हल्ले थांबवले. पण वेढा मात्र उठवला नाही. पीर माचीवरून तोफा काढून घेतल्या. मराठ्यांची नाकेबंदी करून त्यांची उपासमार करून त्यांना शरण यायला लावावे असे इंग्रजांनी ठरवले. ऑक्टोबरनंतर किल्ल्यावर उपासमार होऊ लागली. बाहेरून गंगाधर कार्लेकर काही मदत पाठवू शकले नाहीत. शेवटी नाना फडणविसाने काही सरदारांना हाताशी घेऊन मोठी फौज जमा केली आणि मलंगगड व वसईवर धाडली. स्वतः नाना व हरिपंत फडके दहा हजार फौजेसह खंडाळ्याला आले व त्यांनी राजमाची घाट उतरून कल्याणकडे जायचे ठरवले. त्यामुळे हार्टलेला प्रतिशह दिला जाणार होता. ताबडतोब हार्टलेने मलंगगडावरून सैन्य काढून घेतले व लगेचच मराठांनी मलंगगडाकडे जादा कुमक व रसद धाडली. अशाप्रकारे मराठांनी अखेरपर्यंत मलंगगड शर्थीने लढवला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे[संपादन | स्रोत संपादित करा]

माचीवरून सरळ पुढे जात पलीकडचे टोक गाठायचे. तेथून एका चोर वाटेने खाली उतरले की गडाच्या निम्म्या उंचीवर एक आश्रम लागतो. तिथून गडाच्या दक्षिण व उत्तर टोकाच्या दिशेने वळसा घेत जाणाऱ्या वाटा निघतात. पहिली वाट खाली वावंजे गावात जाते. तेथून पनवेलला जायला एस टी मिळते. उत्तर दिशेच्या वाटेने गेले की दोन वाटा फुटतात. सरळ जाणारी वाट गडाला वळसा घालून पालखीसारख्या आकाराच्या खडकाखालून किल्ल्यावर जाते. उजवीकडे खाली उतरणारी वाट मलंगगड व गणेश कार्तिक सुळक्यांचा डोंगर यांच्यामधील खिंडीत पोहचते. माचीवरून बालेकिल्याकडे जाण्यासाठी कडाला उजवीकडे ठेवत वळसा घालून गेले की खोदीव पायऱ्या दिसतात. पायऱ्यापुढे एक गुहा व पाण्याचे टाके आहे. येथून पुढे जाणे कठीण आहे. पन्नास साठ पायऱ्यांनंतरच्या पायऱ्या तुटलेल्या आहेत. तो भाग चढण्यासाठी दहा बारा फुटांचा एक पाईप आडवा टाकलेला आहे आणि हातांच्या आधारासाठी दोर लावला आहे. हा अवघड टप्पा पार करून दहा मिनिटांत गडमाथ्यावर पोहचता येते. शिरोभाग तसा लहान आहे. छप्पर उडालेले पण भिंती शाबूत असलेला एक वाडा दिसतो. त्याच्या मागे खोदलेली सात टाकी आहेत. बालेकिल्याच्या मध्यभागी औदुंबराचे झाड आहे.श्रीगणेश मंदिरसुद्धा आहे.आणि काही ठिकाणी तटबंदीही आहे. बालेकिल्याच्या समोरच देवणीचा सुळका आहे. येथे येणारे भाविक या समोरच्या देवणीवर एक दगड फेकून मारण्याचा सोपस्कार करतात. दगड जर देवणीवर पोहोचला तर मनातली गोष्ट साध्य होते असे म्हणतात. पूर्वेकडून नैर्ऋत्येकडे गोरखगड, राजमाची, माथेरान, पेब, इर्शाळ, प्रबळगड हा परिसर दिसतात.

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन | स्रोत संपादित करा]

कल्याणहून सकाळी अर्ध्या तासात बसने गडाच्या पायथ्याशी पोहचता येते. पनवेल वरुण वावंजे गावांसाठीही बसची सोय आहे, वावंजे गावपासुन २ की.मी. अंतरावर गडाचा पायथा आहे, पायथ्यापर्यंत रिक्षाची सोय आहे, गडाच्या निम्म्या उंचीवर तेथील सुप्रसिद्ध हाजीमलंग दर्गा आहे. तिथपर्यंत पायऱ्या आहेत. वाटेत दुकाने आहेत. एक देवीचे मोठे मंदिर आणि शंकराचे लहान देऊळ आहे. वरच्या या दर्ग्यापर्यंत भविकांची भरपूर वर्दळ असते. दर्ग्याच्या अलीकडे दुकानांच्या रांगेतून एक बोळ उजवीकडे जातो. तेथे घरे आहेत आणि विहीरही आहे. वाट समोरच्या डोंगराला लागून उजवीकडून वर चढायला लागते. पधंरा वीस मिनिटांत पहिला चढ पार करून वरच्या उभ्या कड्यापाशी पोहचता येते. तसेच श्री मलंगगडाच्या दक्षिणेच्या समोरील बाजूस पनवेल तालुक्यातील (शिरवली गाव) आहे त्या गावा समोर एक आदिवासी कोंडपवाडी आहे त्या ठिकाणाहून एक सोपी पायवाट आहे. पूर्वी रोजी रोटी साठी गावकरी गडावर याच वाटेतून जात असत

राहण्याची सोय[संपादन | स्रोत संपादित करा]

येथे राहण्याची सोय आहे

जेवणाची सोय[संपादन | स्रोत संपादित करा]

येथे जेवणाची सोय आहे. गडावर लहान मोठी हॉटेले आणि इतर दुकाने आहेत.

पाण्याची सोय[संपादन | स्रोत संपादित करा]

गडावर अनेक टिकाणी पाण्याची टाकी आहेत. यातील पाणी पिण्यासाठी वापरता येऊ शकते.

जाण्यासाठी लागणारा वेळ[संपादन | स्रोत संपादित करा]

पायथ्यापासून २ तास.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

हेसुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:विस्तार-किल्ला साचा:महाराष्ट्रातील किल्ले (विभागवार) साचा:महाराष्ट्रातील किल्ले

साचा:विस्तार