Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
मलिक अंबर - मराठीपिडिया Jump to content

मलिक अंबर

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
मलिक अंबरची खुलताबाद जि.औरंगाबाद येथे असलेली कबर (इ.स. १८६० चे छायाचित्र)

मलिक अंबर (इ.स. १५४६ - इ.स. १६२६) हा मूर्तझा निजामशहा दुसरा ह्या अहमदनगरच्या निजामाचा प्रधान होता.मलिक् अम्बर् याचा जन्म अन्दाजे १५४९ मधे एका ह्ब्शी परिवारामधे झाला. मलिक अंबर युद्धशास्त्र आणि प्रशासनात पारंगत असणारा कर्तृत्ववान आणि स्वामीनिष्ठ प्रधान होता. त्याने मोडकळीस आलेली दख्खन प्रांतातली महसूल-व्यवस्था सुधारली. खडकी (सध्याचे औरंगाबाद) ह्या शहराची स्थापना मलिक अंबरने केली.

सुरुवातीचा काळ[संपादन | स्रोत संपादित करा]

मलिक अंबर हा जन्माने इथिोपिया येथील होता.malik [] त्याच्या आई-वडीलांनी दारिद्र्याला कंटाळून त्याला गुलाम म्हणून विकला होता. पुढे भारतात आल्यावर त्याने आपल्या कर्तृत्वाने १५०० सैनिकांचे स्वतःचे सैन्यपथक उभारले आणि तो दख्खन प्रांतात राज्य करणाऱ्या राजांची चाकरी करु लागला.

महसूल व्यवस्था[संपादन | स्रोत संपादित करा]

दुसऱ्या मूर्तझा निजामशहाच्या पदरी सेवेत असताना प्रधान म्हणून त्याची प्रगती झाली. खडकी येथे राजधानी केल्यावर त्याने प्रथम शेतजमीन महसूल पद्धतीत सुधारणा करण्याचे काम हाती घेतले. निजामशाहीतील शेतसाऱ्याचे दर ठरवले. यासाठी त्याने उत्तरेतील तोडरमलाची पद्धत स्वीकारली. इजाऱ्याने जमिनी देण्याची चाल बंद करून त्याने आपल्या सखाराम मोकाशी, आनंदराव, साबाजी या सहकाऱ्यांच्या मदतीने सर्व शेतांची मोजणी व पाहणी करून गत पाच वर्षांच्या उत्पन्नाची सरासरी काढली. या उत्पन्नाच्या दोनपंचमांश प्रमाणात सारा आकारणी केली.[] इ.स. १६१४ पासून पुढे हा महसूल धान्याच्या स्वरुपात न गोळा करता पैशाच्या रुपात गोळा करण्यास सुरुवात केली आणि महसूलाचा वाटा एक तृतियांशापर्यंत कमी केला. त्याने त्या काळी उत्तर भारतात प्रचलित असणाऱ्या व्यवस्थेसारखा हा महसूलाचा वाटा हा ठरावीक रकमेवर निश्चीत न करता प्रत्येक वर्षाच्या शेतकी उत्पन्नानुसार बदलण्याची मुभा दिली.

त्यामूळे कष्टकरी शेतकऱयांमधे तो लोकप्रिय ठरला. सततच्या होणाऱ्या युद्धांमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा ताण कमी झाला.

मृत्यू[संपादन | स्रोत संपादित करा]

८० वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेल्या मलिक अंबरचा मृत्यू इ.स. १६२६ रोजी झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा फतेह खान हा निजामशाहीचा प्रधान झाला. मात्र फत्ते खान हा हुशार नव्हता. मलिक अंबरच्या मृत्यू नंतर त्यांच्या कबरी बद्दल अनेक वाद आहेत एक कबर खुल्ताबाद येथे आहे तर एक कबर घाटी दवाखान्यात आहे असा उल्लेख मिळतो

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:विस्तार