महा विषुव संक्रांती

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
बली जटा लंकेश्वारी मंदिर ओरिसा येथील उत्सव

महा विषुव संक्रांती हा ओरिसा राज्यातील हिंदू आणि बौद्ध उपासकांचा नवीन वर्ष स्वागताचा महत्त्वाचा सण मानला जातो.[१] यालाच पान संक्रांत (ପଣା ସଂକ୍ରାନ୍ତି) असेही म्हटले जाते. सौर कालगणनेवर आधारित असलेला हा दिवस मेष या पारंपरिक महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. ग्रेगोरियन कालगणनेनुसार हा दिवस १४ एप्रिल या दिवशी येतो.

स्वरूप

या दिवशी शिव, शक्ती आणि हनुमान यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले जाते. हा दिवस हनुमानाची जन्मतिथी मानला जातो.[२][३] तीर्थक्षेत्री जाऊन लोक नदीमध्ये पवित्र मानले गेलेले स्नान करतात. जत्रांचे आणि मेळ्याचे आयोजन या दिवशी केले जाते. नारळाचे पाणी, कैरीचा रस आणि दही घातलेले पेय या दिवशी आवर्जून प्यायले जाते.या दिवसाचे पान संक्रांत हे नाव या पेयामुळे पडले आहे.[४] या दिवशी मिठाई वाटली जाते. आनंदोत्सव साजरा केला जातो.

पेय

मंदिरातील पूजा

हा दिवस ओरिसा राज्यातील लोक देवदर्शनाने साजरा करतात. जगन्नाथपुरी येथील मंदिरात कृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्तीची विशेष पूजा केली जाते.[६]

संदर्भ