माया (हिंदू धर्म)

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार

माया Maya (/ˈmɑːjə/; Devanagari: माया, IAST: māyā), literally "illusion" or "magic", ( (Sanskrit: माया) हे नाम असून त्याचा अर्थ चुकीची कल्पना असा होतो.

माया या शब्दाचा वापर - माया हा शब्द रामदासस्वामी प्रायः वापरतात तरी त्यांनी कारणपरत्वे मूळमाया, महामाया, वैष्णवी माया, गुणमाया, गुणक्षोभिणीमाया, अविद्यामाया आणि दृश्यमाया असेही विशिष्ट शब्द वापरलेले आहेत. त्यांचा संक्षिप्त खुलासा येथेच करणे अनुचित होणार नाही. ही माया वैष्णवी म्हणजे विष्णूची अथवा परमात्म्याची आहे, तसेच ती विष्णूच्या मोहिनीईरूपाप्रमाणे मोहात पाडणारी आहे.

प्रकृतीला माया म्हटले आहे. [१]

म ह्या धातूचा अर्थ मावणे असा आहे. म्हणून हे विश्व ज्यात सामावलेले आहे ती माया.

मा ह्या धातूचा मोजणे वा मर्यादित करणे असाही अर्थ आहे.

मा म्हणजे नाहीं आणि या म्हणजे जी. म्हणून जी अस्तित्वात नसून जी भासते ती ' माया ' !

मायेच्या पलीकडे कसे जायचे?माया ओलांडल्या खेरीज भगवंत दर्शन अशक्य कसे ?

ज्या माणसाला दृष्य जग खरे वाटते,दृश्याच्या मागे सूक्ष्म आहे असे जो मानीत नाहीं, जो या अज्ञानातच सुख मानतो.या क्षणभंगुर सुखा पलीकडे शाश्वत सुख आहे,याचे ज्याला कल्पनेने ही ज्ञान नाहीं. त्याच्या बाबतीत मायेच्या पलीकडे जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाहीं.

पण ज्याचा नित्यानित्यविवेक निर्माण जागा झाला आहे त्याला मायेच्या पलीकडे जावे असे वाटते. कारण 'माया' ओलांडल्याशिवाय भगवंताचे दर्शन अशक्य आहे.संत मायेचा पडदा दूर सारा असे सांगतात.सद्गुरू वा भगवंत यांनी कृपा केली तरच साधक 'माया' ओलांडू शकतो.

माया सत्याला असत्य करते.ज्ञानावर अज्ञानाचे आवरणं टाकते.त्यामुळे आनंद नाहीसा होवून दुःख निर्माण होते.माया ही भगवंताची शक्ती आहे. ह्या शक्तीला जाणणे कठीण आहे.

माया विश्वाला व्यापून आहे.या विश्वव्यापी मायेला व्यक्तीच्या संदर्भात 'विद्या' म्हणतात. मी

देह आहे असा निच्शय होणे म्हणजे अविद्या होय.घराची भिंत पडली तर भिंत पडली म्हणता

घर पडले म्हणत नाहीं, पण ठेच लागून पडलात तर मी पडलो म्हणतात. माझा देह पडला असं म्हणत नाहीं मायेचे कार्य ते हेच. असे महाराज म्हणत. मायेच्या पलीकडे जाण्यासाठी

भगवंताला शरण जाणे हा राजमार्ग आहे.

माया म्हणजे अज्ञान ( Error ).अज्ञानात असणाऱ्या साधकाला अज्ञानाच्या सहाय्याने त्यातून बाहेर पडणे शक्य नसते.म्हणून जे पुरुष मायेला पार करून गेले आहेत त्यांना शरण जावे.त्यांचे ऐकावयाला शिकावे. मन विकाराधीन होवू नये यासाठी भगवंताचे, स्मरण करीत राहावे

मुख्य विचार

साचा:हिंदू धर्म