मार्गशीर्ष

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

मार्गशीर्ष हा भारतीय पंचांगानुसार वर्षातील नववा महिना आहे. यालाच अग्रहायण किंवा अगहन असेही म्हटले जाते. हा ३० दिवसांचा असतो.

हा हिंदू पंचांगाप्रमाणेही ९वा महिना आहे. हा महिना सर्वोत्तम आहे असे श्रीकृष्णाने भगवद्‌गीतेत सांगितले आहे. (मासानां मार्गशीर्षोहम् |)

मार्गशीर्ष महिन्याला हिंदीत अगहन म्हणतात.

बहुधा मार्गशीर्ष महिन्यात केव्हातरी सूर्य धनुराशीत प्रवेश करतो. त्यादिवशी धनुर्मास आणि खरमास सुरू होतात.

मार्गशीर्ष महिना हा ग्रेगोरियन कॅलेंडरच्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात येतो.

मार्गशीर्ष महिन्यातील महत्त्वाचे दिवस

  • शुक्ल प्रतिपदा : देव दीपावली; मार्तंड भैरव षड्रात्रोत्सव प्रारंभ (चंपा षष्ठीच्या नवरात्राची सुरुवात)
  • शुक्ल षष्ठी : चंपा षष्ठी. मार्तंड भैरव नवरात्राचा शेवटचा दिवस.
  • शुक्ल सप्तमी : मित्र सप्तमी
  • शुक्ल नवमी : महानंदा नवमी
  • शुक्ल एकादशी : मोक्षदा एकादशी; गीता जयंती
  • पौर्णिमा : दत्त जयंती; अन्नपूर्ण जयंती
  • कृष्ण एकादशी : सफला एकादशी
  • अमावास्या : वेळ अमावास्या

साचा:भारतीय दिनदर्शिका महिना साचा:विस्तार साचा:भारतीय महिने साचा:हिंदू कालमापन