मुधोळ संस्थान

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:गल्लत साचा:माहितीचौकट भूतपूर्व देश

मुधोळ संस्थान हे ब्रिटिश भारतातल्या मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते.

स्थापना

मुधोळ जहागिरीची स्थापना इ.स. १४६५ या वर्षी झाली. त्‍याचे जहागीरदार घोरपडे घराणे होते. इ.स. १६७० मध्ये मुधोळ जहागिरीचे रूपांतर घोरपडे संस्थानिक असलेल्या मुधोळ संस्थानात झाले. त्यानंतर हे संस्थान इ.स. १८१९ मध्ये ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत आले.

क्षेत्रफळ

मुधोळ संस्थानाचे क्षेत्रफळ ५०८ चौरस किमी इतके होते.

स्वातंत्र्योत्तर कालखंड

भारत स्वतंत्र झाल्यानंतर मुधोळचे महाराजा राजा भैरवसिंहराव मालोजीराव घोरपडे (द्वितीय) यांनी मुधोळ संस्थान ८ मार्च १९४८ या दिवशी भारतीय संघराज्यात विलीन केले. मुधोळ हे गाव कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यात आहे.