मुलुगु
साचा:About साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

मुलुगु हे तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील एक शहर आहे. हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. १७ फेब्रुवारी २०१९ रोजी जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्याचे विभाजन करून मुलुगु जिल्ह्याची स्थापना करण्यात आली.[१] पूर्वी जयशंकर भूपालपल्ली जिल्हा हा वरंगल जिल्ह्याचा भाग होता. मुलुगु हा वारंगल जिल्ह्याचा एक भाग होता. मुलुगु हे राष्ट्रीय महामार्ग १६३ वर आहे.
लोकसंख्या[संपादन | स्रोत संपादित करा]
२०११ च्या जनगणनेनुसार, मुलुगुची लोकसंख्या २,९४६ कुटुंबांसह १२,१३५ होती. एकूण लोकसंख्येमध्ये ६,२४२ पुरुष आणि ५,८९३ स्त्रिया आहेत. ८,३२४ साक्षरांसह सरासरी साक्षरता दर ६८.६% होता.[२]
भुगोल[संपादन | स्रोत संपादित करा]
मुलुगुची सरासरी उंची २०७ मीटर आहे.[३] मुलुगुमध्ये अर्ध-उष्णकटिबंधीय हवामान आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७८८ मिलिमीटर (३१.० इंच) आहे.[४]
पर्यटन[संपादन | स्रोत संपादित करा]
जगप्रसिद्ध रामप्पा मंदिर मुलुगुपासून १५ किमी (९.३ मैल) अंतरावर आहे.
प्रशासन[संपादन | स्रोत संपादित करा]
मुलुगु राज्य विधानसभा मतदारसंघासाठी एक जागा आहे. ग्राम पंचायती तर्फे गावाचा कारोभार पाहिला जातो.
वाहतुक[संपादन | स्रोत संपादित करा]
मुलुगु येथे TSRTC (तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ)चे बसस्थानक आहे आणि सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरवते. मुलुगु ते छत्तीसगढला जाणारा राष्ट्रीय महामार्ग १६३ आहे.