मोर्शी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

भोगोलिक स्थान आणि लोकसंख्या

मोर्शी हे अमरावती जिल्ह्यातील २५२० हेक्टर क्षेत्राचे तालुका असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ४२४५४ कुटुंबे व एकूण १,८२,३३३ लोकसंख्या आहे. यामध्ये ९३७८३ पुरुष आणि ८८७०१ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १६.०१ असून अनुसूचित जमातीचे १०. ०८ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणनेतील स्थल निर्देशांक ४४४९०५ [१] आहे.या तालुक्या मध्ये १६६ खेडे गावे आहेत व एक शहर आहे

साक्षरता

  • एकूण साक्षर लोकसंख्या: ७८. ७१%
  • साक्षर पुरुष लोकसंख्या: ८२. २%
  • साक्षर स्त्री लोकसंख्या: ७५. ०२%


शैक्षणिक सुविधा

या गावात एकूण १३ शाळा आणि २ महाविद्यालय आहेत . या गावात मराठी माधयमिक ९ शासकीय शाळा आहेत व एक उर्दू माधयमिक शाळा आहे .या गावात ४ इंग्रजी माध्यमिक शाळा आहेत
मराठी माध्यमिक शाळेची नावे :-
१. नगर परिषद प्राथमिक शाळा
२. नगर परिषद प्राथमिक शाळा क्र . १.
३. नगर परिषद प्राथमिक शाळा क्र . २.
४. नगर परिषद प्राथमिक शाळा क्र . ५.
५. नगर परिषद प्राथमिक शाळा.
६. नगर परिषद उर्दू प्राथमिक शाळा .
७.शिवाजी उच्च माध्यमिक शाळा .
८. शिवाजी कन्या शाळा
९. गोपाळराव वानखेडे माध्यमिक शाळा
१०. ज्ञानदीप विद्यामंदिर व उच्च माध्यमिक शाळा
इंग्रजी माध्यमिक शाळेची नवे :-
१. शांतिनिकेतन इंग्लिश प्रायमरी स्कूल
२. जिजाऊ किड्स इंग्लिश प्रायमरी स्कूल
३. न्यू गोल्डन इंग्लिश प्रायमरी स्कूल
४.एकविरा इंग्लिश प्रायमरी स्कूल
महाविद्यालयची नावे
१. भारतीय महाविद्यालय .
२.आर . आर . लाहोटी महाविद्यालय .


मोर्शी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचा एक तालुका आहे.सालबर्डी हे धार्मिक स्थळ व मोर्शीपासून पच्शिमेस ९ किमी अंतरावर आहे. येथे महादेवाचे जागृत ठिकाण आहे.येथे महाशिवरात्रीला यात्रा राहते दुरदूरून भक्त दर्शनाला येतात महाराष्ट्राच्या सीमेवर असलेलं व सातपुडा पर्वत रांगा मध्ये वसलेलं भुयार अतिशय देखणीय व निसर्गरम्य स्थळ आहेत.महादेव महाराज देवस्थान,दादाजी धुनिवाले देवस्थान व महानुभाव पंथीय देवस्थान इत्यादी धार्मिक स्थळे सुद्धा आहेत येथिल नळ दमयंती सागर व अप्पर वर्धा धरण दक्षिणेकडे 9 किमी अंतरावर आहे व पर्यटन ठिकाण म्हणुन ओळखले जाते.हे धरण वर्धा नदीवर बांधण्यात आले आहे व माळू आणि नळा ह्या तिच्या मुख्य उपनद्या आहेत धरणाला 13 दरवाजे असुन संपूर्ण जिल्हाचा पाणीपुरवठा केला जातो. मासेमारी हा व्यवसाय भारी प्रमाणात चालतो येथील मासे नागपुरमधिल बाजारात उपलब्ध करून दिले जातात.येथे मत्स बीज केंद्र आहे. येथे राहु,कतला,बास व बाम इत्यादी माशांची निर्यात केली जाते येथील वनविभागाने व आमदारांच्या साहाय्याने एक सुंदर असं उद्यान 2016 साली मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करून तालुक्यातील लोकांसाठी सुरू करण्यात आले आहे येथे विविध प्रकारचे रोपटे लावण्यात आले आहेत व लहान मुलांसाठी विविध प्रकारचे खेळणे आहेत.दरवर्षी विविध सहली उद्यानाला भेट असतात संपूर्ण उद्यान वनविभागाच्या देखरेखीखाली वावरत आणि चालत आहे उद्यान फिरायचे व पाहायचे 15रू प्रती व्यक्ती द्यावे लागतात व त्याच पैशातून उद्यान विकसित होत आहे तालुक्यातील आणखी एक गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील अडीच व पाच दिवसाचा गणपती विसर्जन झाल्यानंतर..10 दिवसाचा मंडळाचा गणपती संपूर्ण महाराष्ट्रात मोर्शी तालुक्यातील अंबाडा यागावामध्ये पारंपारिक पद्धतीने विसर्जित केला जातो नवव्या दिवशी रात्री 12.00च्या सुमारास मुर्ती हालवून सर्व मंडळानीं सांगितलेल्या वाद्यांचा गजरात बाप्पाला दुसऱ्या दिवशी दिवसभर मज्जा करत गणपती विसर्जन केले जाते येथे गोंदिया व नागपूर या जिल्हातील प्रसिद्ध डी जे धुमाल या प्रसारित वाद्यांचा समावेश असतो विशेष म्हणजे या गावाची लोकसंख्या 35000 एवढी असुन सुद्धा येथे गणपतीचा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो

साचा:विस्तार साचा:अमरावती जिल्ह्यातील तालुके