मोहम्मद अझहरुद्दीन

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:बदल

साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती

साचा:Stub-भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन एक भारतीय राजकारणी आणि माजी क्रिकेटपटू आहे. 1990च्या दशकात त्यांनी 47 कसोटीत भारताचे कर्णधारपद भूषवले होते. ते मधल्या फळीतील फलंदाज होते. सन 2000 मध्ये कुप्रसिद्ध मॅच फिक्सिंग प्रकरणात फिक्सिंग झाल्यानंतर त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीवर बीसीसीआयने जीवनभर बंदी घातली. 8 नोव्हेंबर 2012 रोजी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने ही बंदी उठवली.[१] 2009 मध्ये, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर मोरादाबाद मतदारसंघातून अझरुद्दीन संसदेत सदस्य म्हणून निवडून आले होते.[२]

बालपण आणि शिक्षण

अझरुद्दीन यांचा जन्म हैदराबादमध्ये मोहम्मद अजीझुद्दीन आणि युसूफ सुलताना यांच्या कुटुंबात झाला. त्यांनी ऑल सेंट हायस्कूल, हैदराबाद येथे शिक्षण घेतले आणि निजाम कॉलेज, उस्मानिया विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.[३]साचा:क्रम

क्रिकेट कारकीर्द

31 डिसेंबर 1984 रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये अजहरुद्दीनने पदार्पण केले आणि पहिल्या तीन सामन्यांमध्ये तीन शतके झळकावली.[४] अझरुद्दीनने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 22 शतके केली, 45च्या सरासरीने आणि एकदिवसीय सामन्यात 37च्या सरासरीने 7 शतके केली. क्षेत्ररक्षक म्हणून त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 156 झेल घेतले. ते 99 कसोटी सामने खेळले आहेत, श्रीलंकेविरुद्ध 199 सर्वाधिक धावा केल्या आहेत.[५] 300 एकदिवसीय सामन्यांमध्ये तो पहिला खेळाडू ठरला. त्याने पदार्पणात लागोपाठच्या सलग कसोटी सामन्यांत शतके झळकावण्याचा विक्रम केला आहे (3).[६]

कर्णधार

1989 मध्ये कृष्णम्माचारी श्रीकांत यांच्यापाठोपाठ अझरुद्दीन भारतीय संघाचे कर्णधार बनले. 47 कसोटी आणि 174 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यांनी 90 एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवून टीमची धुरा सांभाळली, ते 2 सप्टेंबर 2014 रोजी एम.एस. धोनीने पार केला. कर्णधार म्हणून त्यांनी 14 कसोटी सामन्यांत विजय मिळवला, तो सौरव गांगुलीने 21 कसोटी सामन्यात विजय मिळवून पार केला.[५]

मॅच फिक्सिंग प्रकरण

2000 मध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणात अजहरुद्दीनवर आरोप ठेवण्यात आला होता.[७] मग दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅंसी कॉनेंज याने सूचित केले की, अझरुद्दीनने त्याचा सट्टेबाजांशी परिचय करून दिला होता .[८] आयसीसी आणि बीसीसीआयने अझरूद्दीनवर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अहवालावर आधारित जीवनभर बंदी घातली.[९] स्पॉट फिक्सिंगसाठी त्याच्यावर बंदी घालण्यात येणारा तो पहिला खेळाडू होता.

8 नोव्हेंबर 2012 रोजी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आशुतोष मोहोन्ता आणि कृष्णा मोहन रेड्डी यांच्या खंडपीठाने लादलेली बंदी मागे घेतली.[१०][११][१२]

शैली

अझरुद्दीन हा भारताचा मधल्या फळीतील फलंदाज होता. त्यांची फलंदाजी डौलदार फलंदाजीची शैली म्हणून ओळखली जाते. सेवानिवृत्त क्रिकेटपटू वेंकटराघवन यांनी त्यांच्या या शैलीचे कौतुक केले आहे.[१३]साचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, १९८७ साचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९२ साचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९६ साचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९९

राजकीय कारकीर्द

19 फेब्रुवारी 2009 रोजी अझरुद्दीन औपचारिकपणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झाले होते. उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथून 2009 साली त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली.

कारकिर्दीची आकडेवारी

कसोटी कारकीर्द

संघ धावा सरासरी शतके
ऑस्ट्रेलिया 780 39.00 2
इंग्लंड 1978 58.09 6
न्यू झीलंड 1152 61.23 2
पाकिस्तान 1089 40.47 3
साऊथ आफ्रिका 915 41.00 4
श्रीलंका 1215 55.23 5
वेस्ट इंडीज 539 28.37 0
झिम्बाब्वे 59 14.75 0
एकूण 6215 45.04 22

पुरस्कार

1986 मध्ये अझरुद्दीन यांना अर्जुन पुरस्कार आणि 1988 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[१४] 1991 साली त्यांना विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारही मिळाला.

वैयक्तिक जीवन

1987 मध्ये अझरुद्दीनने नऊरीनशी विवाह केला होता. 1996 साली त्यांनी नऊरीनशी घटस्फोट घेतला आणि अभिनेत्री संगीता बिजलानीशी लग्न केले.[१५] अझरचा बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा याच्या कथित संबंधामुळे संगीता बिजलानीशी 2010 साली घटस्फोट झाला.[१६][१७] त्यांचा मोठा मुलगा अयाजुद्दीन यांचे 2011 मध्ये एका अपघातात निधन झाले.

संदर्भ

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे

साचा:S-start साचा:S-bef साचा:S-ttl साचा:S-aft साचा:S-bef साचा:S-ttl साचा:S-aft साचा:S-end साचा:Indian Test Cricket Captains साचा:India ODI Cricket Captainsसाचा:Navboxes colourसाचा:Authority control

  1. साचा:स्रोत बातमी
  2. साचा:स्रोत बातमी
  3. साचा:संकेतस्थळ स्रोत.
  4. चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; :0 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  5. ५.० ५.१ साचा:स्रोत बातमी
  6. साचा:स्रोत बातमी
  7. साचा:स्रोत बातमी
  8. साचा:स्रोत बातमी
  9. साचा:Cite report
  10. चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Wisden India नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  11. साचा:स्रोत बातमी
  12. साचा:स्रोत बातमी
  13. चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Express2 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  14. साचा:संकेतस्थळ स्रोत
  15. चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Express3 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  16. साचा:स्रोत बातमी
  17. साचा:स्रोत बातमी