रघुनाथराव पेशवे

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:इतिहासलेखन साचा:माहितीचौकट राज्याधिकारी रघुनाथ बाजीराव भट (पेशवे), अर्थात रघुनाथराव पेशवा, (अन्य नामभेद/प्रचलित नावे: राघोबादादा, राघो भरारी) (डिसेंबर १६, इ.स. १७२१ - इ.स. १७८२) हे थोरले बाजीराव यांचे पुत्र होते. इ.स. १७७३ ते इ.स. १७७४ या कालखंडात मराठा साम्राज्याचे पेशवा, म्हणजे पंतप्रधान, होते. यांनी इ.स. १७५० च्या दशकात मराठा सैन्याच्या पंजाब व अफगणिस्तानातील युद्धमोहिमांचे नेतृत्व केले. याच्या कामगिरीने मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले.

पेशवाईसाठी प्रयत्न

नानासाहेब पेशव्यांचे निधन झाल्यावर राघोबादादा पेशवे होतील असे सर्वाना वाटले होते. पण नानासाहेबांबाचा मधला मुलगा माधवराव यांना पेशवाईची वस्त्रे देण्यात आली कारण नानासाहेबांचा थोरला पूत्र पानिपतच्या युद्धात मारले गेले होते. माधवराव हे केवळ १६ वयाचे असताना त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली गेली असल्याने, नात्याने काका असलेल्या राघोबादादानी माधवरावांना हाताशी घेऊन राज्य करावे असे छत्रपतींचे आदेश होते. माधवराव हे लहान व अननुभवी असल्याने फारसे काकांच्या शब्दाबाहेर नव्हते. ते करतील ती पूर्व दिशा असा काही काळ गेला. पुढे माधवराव आपल्या विचाराने राज्य करू लागले. रघुनाथराव हे अतिशय चंचल अशा व्यक्तिमत्त्वाचे होते. त्यांच्या पदरी असलेल्यानी त्यांना अनेकदा चुकीचे सल्ले दिल्याने त्यांनी केलेल्या कारवाया वादग्रस्त राहिल्या. विशेषतः सखाराम बापूंच्या सल्ल्यामुळे बऱ्याचदा ते पेशवाईच्या विरोधात उभे झाले. पहिल्या वेळी तर ते निजामाची मदत घेऊन आळेगाव येथे पेशवाईविरुद्ध उभे ठाकले.

साचा:पेशवे साचा:मराठा साम्राज्य साचा:पुणे