रघूजी भोसले (प्रथम)
भोसले राजवंशाचे रघूजीराजे भोसले (१६९५ - १४ फेब्रुवारी १७५५) हे मराठा साम्राज्याचे नावाजलेले सरदार होते. ते रघूजी भोसले प्रथम, राघोजी भोसले या नावांनीही ओळखले जातात. त्यांनी छत्रपती शाहूंच्या कारकिर्दीत पूर्व-मध्य भारतात नागपूर साम्राज्यावर कब्जा केला.[१] १८५३ मध्ये इंग्रजांनी ताबा घेण्यापर्यंत त्यांच्या वारसांनी नागपुरात राज्य केले.
मूळ[संपादन | स्रोत संपादित करा]
भोसले कुटुंब हे मूलतः देवर किंवा देवूर (सध्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात) गावचे प्रमुख होते. रघुजींचे आजोबा आणि त्यांचे दोन बंधू शिवाजी महाराजांच्या सैन्यांत लढले होते आणि त्यांच्यातील सर्वात प्रतिष्ठित लोकांना सैन्यात उच्च लष्करी पदे आणि बेरारमधील चौथांचा संग्रह बहाल करण्यात आला होता.
नागपूर साम्राज्य[संपादन | स्रोत संपादित करा]
नागपूर त्यावेळी गोंडवाना साम्राज्याची राजधानी होती जिथे देवगडच्या गोंड घराण्याचे राज्य होते. छिंदवाडा जिल्ह्यातील देवगडचा गोंड राजा बख्त बुलंद शहा याने १७०२ साली नाग नदीच्या तीरावर नागपूर शहराची स्थापना केली. बख्त बुलंद शहानंतर त्याचा मुलगा राजा चांद सुलतान देवगडच्या गादीवर आला. त्याने १७०६ साली त्याची राजधानी नागपुरास हलवली.
१७३९ साली राजा गोंड यांचे निधनानंतर त्यांच्या वर्षांमध्ये वाद उद्भवला. रघुजी त्यावेळी मराठ्यांच्या वतीने बेरार प्रांतात शासन करीतहोते. राजाच्या विधवाने मराठ्यांच्या वतीने रघुजींची मदत मागितली. रघुजींनी मध्यस्ती करून राजा गोंडच्या दोन पुत्रांना ज्यांना आधी राज्याबाहेर काढून बेरारला धाडण्यात आले होते, राज्य दिले. पण १७४३ मध्ये दोन भावात परत वाद उद्भवला. थोरल्या भावाने परत रघुजींना विनंती करून हस्तक्षेप करण्यास सांगितले. तेव्हा रघुजींनी थोरल्या भावयाविरोधातील बंडाळी मोडून काढली. पण कमी काळात दोनदा एवढ्या जवळ हाती आलेली सत्ता परत न करण्याचा मोह रघुजींना आवरला नाही आणि त्यांनी गोंड राजा बुरहान शानला, फक्त राजकीय बाहुले बनवून खरी सत्ता आपल्या हातात घेतली.
दमलेचररीची लढाई[संपादन | स्रोत संपादित करा]
दोस्त अली खानने चंदासाहेबांना तिरसव्यपुरम राजाच्या विरोधात मोर्चा काढायला सांगितलं. तेव्हा तिरसव्यपुरमच्या राजाने मराठा साम्राज्याची मदत मागितली. लवकरच मुघल सेना आणि मराठा सरदार रघुजींच्या कमानीत मराठा सेना दमलेचररी येथे भिडल्या. ही मुघल आणि मराठा शैब्यातली एक मुख्य लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. या लढाईत रघुजींनी दोस्त अली खानाचा पाडाव करून कर्नाटकेत तीन वर्षांपर्यंत कब्जा मिळवला.
बंगालमधील मोहिमा[संपादन | स्रोत संपादित करा]
कर्नाटकातील त्रिचनापोलीच्या लढाईतील यशस्वी मोहिमेनंतर मराठा साम्राज्याने बंगालमधील मोहीम हाती घेतली. रघुजींना या मोहिमेचे नेते बनवण्यात आले. १७२७ मध्ये मुर्शीद कुली खानच्या मृत्यूनंतर त्या भागात अंदाधुंदीच्या परिस्थितीचा यशस्वीपणे वापर करून राघूंईंनी रघुजींनीओरिसा आणि बंगालच्या काही भागावर कायमचा कब्जा केला.[२] बंगालच्या नवाबाने मराठ्यांना सुवर्णरेखा नदीपर्यंतचा प्रदेश आणि बंगालची २० लाख रुपये (पश्चिम बंगाल आणि बांगलादेश दोन्हीसह) आणि बिहार (झारखंडसह) साठी १२ लाख कर मान्य केला. अशा प्रकारे बंगाल मराठा साम्राज्यात सामील झाले.[३]
व्यक्तिमत्त्व[संपादन | स्रोत संपादित करा]
रघुजी अत्यंत धाडसी आणि शीघ्र निर्णयी असे मराठा सरदार होते. त्यांनी शेजारील राज्यातील राजकारणिक समस्यांचा फायदा उचलत आपले धोरण आखले आणि आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण केल्या. त्यांच्या सैन्याने दोनदा बंगालवर आक्रमण केले आणि कटकवर सुद्धा आपला अंमल स्थापित केला. सन १७४५ ते १७५५ दरम्यान त्यांनी चांदा, छत्तीसगड, आणि संबलपूर आपल्या अखत्यारीत आणले.
मृत्यू आणि उत्तराधिकारी[संपादन | स्रोत संपादित करा]
१४ फेब्रुवारी १७५५ रोजी रघुजींचे निधन झाले. निधनानंतर जानोजी नागपूरच्या गादीवर उत्तराधिकारी म्हणून आले.
२६ जानेवारी १७७४ रोजी रघुजींचे दोन पुत्र जानोजी आणि मुधोजी ह्यांच्यात सत्तेवरून पाचगांव येते लढाई झाली. या लढाईत मुधोजींनी जानोजींचा वध केला आणि आपला मुलगा रघुजी द्वितीय ह्याला गादीवर बसवले. [४]
संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ SNHM. Vol. II, pp. 209, 224.
- ↑ Fall Of The Mughal Empire- Volume 1 (4Th Edn.), J.N.Sarka
- ↑ साचा:स्रोत बातमी