रझाकार (हैदराबाद)

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

रझाकर (उर्दू: رضا کار) हा एक अरबी शब्द आहे ज्याचा शाब्दिक अर्थ 'स्वयंसेवक' असा आहे. हा शब्द उर्दू भाषेत सुद्धा वापरला जातो. दुसरीकडे बांगलादेशात, रझाकार हा शब्द हीन भावनेतून वापरला जातो, तेथे ज्याचा अर्थ 'देशद्रोही' किंवा यहूदा असा होतो. [१]

साचा:माहितीचौकट संघटना

हैदराबादचा शेवटचा निझाम मीर उस्मान अली खान याने हैदराबाद संस्थान भारतात विलीन होण्यापासून वाचवण्यासाठी कासीम रझवीच्या नेतृत्वाखाली एक क्रूर अर्धसैनिक दल स्थापन केले होते. या दलास त्यावेळेस रझाकार असे संबोधले जात असे.[२] हैदराबादच्या या रझाकार दालने तेथील बहुसंख्यांक हिंदूंवर अत्याचार करताना क्रौर्याची परिसीमा गाठली होती. अत्याचाराची तुलना क्रूरकर्मा हिटलरच्या नाझी सैन्याशी केली जाते. त्यामुळे आजही मराठवाडा आणि तेलंगणात या शब्दाकडे शिवी या भावनेने पाहिल्या जाते.[३][४]

इतिहास आणि कार्य

इ.स. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. धर्माधारीत मुस्लिम बहुल प्रांत भारतापासून वेगळा होऊन त्यातून पाकिस्तानची निर्मिती झाली. तर उर्वरित हिंदू बहुल प्रांत हे भारतात विलीन होत होते. हैदराबाद आणि काश्मीर सारखे काही संस्थान मात्र स्वतंत्र झाले. हैदराबाद संस्थानावर तब्बल सहा पिढ्यांपासून निझाम वंशाचे राज्य होते.[५] तत्पूर्वीच इ.स. १९२९ मध्ये हैदराबाद संस्थान मधील एक सेवानिवृत्त अधिकारी 'मोहम्मद नवाझ खान' यांनी संस्थानातील मुस्लिम समाजाच्या हितासाठी मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (लघुरुप एम आय एम)ची स्थापना केली.साचा:Sfn लवकरच एम आय एम मुस्लिम समाजात प्रसिद्धीस आली. त्यात रझाकरांची (स्वयंसेवकांची) मोठ्या प्रमाणात भरती सुरू झाली. या संघटनेचे नेतृत्व अलिगढ मुस्लिम विद्यापीठ तुन शिकून आलेल्या कासीम रझवी कडे दिल्या गेले. कासीम रझवी हा मुस्लिम राष्ट्रवादाचा कट्टर पुरस्कर्ता होता.[६]

कासीम रझवी

लवकरच निझाम सरकारला आणि एम आय एमच्या कारवायांना कंटाळून सर्वधर्मीय जनतेने भारतात विलीन होण्याची मागणी सुरू केली. रझाकरांनी अत्यंत क्रौर्याने ही चळवळ मोडण्यास सुरुवात केली.[७][८]साचा:Sfn


शेवटी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निझाम सरकारच्या विरोधात 'पोलीस ऍक्शन'ची घोषणा केली. १८ सप्टेंबर १९४८ रोजी ऑपरेशन पोलो अंतर्गत मेजर जनरल जे एन चौधरीच्या नेतृत्वाखाली पाच दिशेने निझाम संस्थानावर कारवाई सुरू झाली. भारतीय फौजे पुढे रझाकार फार वेळ टिकू शकले नाहीत आणि कासीम राजवीला अटक झाली. शेवटी २२ सप्टेंबर १९४८ रोजी निझाम सरकारने हार मानली आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.

ऑपरेशन पोलोतील रझाकार

कासीम रजवीला आजीवन कारावास तर एम आय एम आणि रझाकरांवर कायमस्वरूपाची बंदी घालण्यात आली. इ.स. १९५७ मध्ये तत्कालीन सरकारने एम आय एम वरील बंदी हटवली आणि एम आय एमचे रूपांतरण ए आय एम आय एम म्हणजेच ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन मध्ये करण्यात आले. लवकरच कासीम रझवीला केवळ एका अटीवर सोडण्यात आले की तो ४८ तासात भारत सोडून पाकिस्तान मध्ये जाईल.[९][१०]

संदर्भ

साचा:संदर्भयादी

  1. साचा:संकेतस्थळ स्रोत
  2. Moraes, Frank, Jawaharlal Nehru, Mumbai: Jaico. 2007, p.394
  3. साचा:संकेतस्थळ स्रोत
  4. साचा:संकेतस्थळ स्रोत
  5. साचा:Cite book
  6. Moraes, Frank, Jawaharlal Nehru, Mumbai: Jaico. 2007, p.390
  7. Rao, P.R., History and Culture of Andhra Pradesh: From the Earliest Times to 1991, New Delhi: Sterling Publishers, 2012. p. 284
  8. Remembering a legend, The Hindu, 22 August 2008; Aniket Alam, A one-man crusade, it was and still is, The Hindu, 6 January 2003. बहुसंख्यांक हिंदू समाजावरील वाढत्या अत्याचारामुळे तेथील सामान्य जनतेचे जंगलात किंवा भारतातील आसपासच्या गावात स्थलांतर सुरू झाले.
  9. साचा:संकेतस्थळ स्रोत
  10. साचा:संकेतस्थळ स्रोत