राकेश शर्मा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
Rakesh sharma.jpg

राकेश शर्मा (जन्म : १३ जानेवारी १९४९) हे अंतरिक्षात जाणारे पहिले भारतीय आहेत. भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी. भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयूझ टी-११ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले.

राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. "अंतराळातून भारत कसा दिसतो?", या प्रश्‍नाला त्यांनी "सारे जहॉंसे अच्छा हिंदोस्तॉं हमारा' असे अभिमानी उत्तर दिले होते.

पतियाळात जन्मलेला राकेश भारतीय वायू दलात वैमानिक होता. नंतरच्या काळात त्यांचा अशोक चक्र देऊन सन्मान केला गेला.

साचा:विस्तार

साचा:भारतीय अंतराळ संशोधन