राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट विमानतळ

येथे थंबलेले जेट एअरवेजचे बोईंग ७३७ विमान

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या हैदराबाद महानगरातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ हैदराबाद शहराच्या २२ किमी दक्षिणेस शमशाबाद ह्या गावाजवळ स्थित आहे. २३ मार्च २००८ रोजी वाहतूकीस खुला करण्यात आलेला हा विमानतळ सरकारी-खाजगी भागेदारीद्वारे बांधण्यात आलेला भारतामधील दुसराच विमानतळ होता. हा नवा विमानतळ वापरात आल्यानंतर हैदराबादमधील अपूरा पडत असलेला व शहराच्या मध्यभागात असलेला बेगमपेट विमानतळ नागरी वाहतूकीसाठी बंद करण्यात आला.

आंध्र प्रदेशचा दिवंगत मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी ह्याने हैदराबाद विमानतळाला भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी ह्यांचे नाव दिले. सध्या हा विमानतळ भारतामधील सर्वोत्तम विमानतळांपैकी एक मानला जात असून येथून भारतामधील सर्व प्रमुख शहरांसाठी थेट प्रवासी सेवा उपलब्ध आहे.

राजीव गांधी विमानतळ हैदराबाद शहरासोबत एका ११.६ किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गाद्वारे जोडला गेला आहे.

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने

साचा:Airport-dest-list

साचा:संदर्भनोंदी

बाह्य दुवे

साचा:कॉमन्स वर्ग