रानिल विक्रमसिंघे
Appearance
साचा:माहितीचौकट पदाधिकारी रानिल विक्रमसिंघे (सिंहला: රනිල් වික්රමසිංහ ; तमिळ: ரணில் விக்கிரமசிங்க; मार्च २४, इ.स. १९४९) हा श्रीलंकेतील एक राजकारणी व विद्यमान पंतप्रधान आहे. ९ जानेवारी २०१५ रोजी पंतप्रधानपदावर आलेला विक्रमसिंघे ७ मे इ.स. १९९३ ते १९ ऑगस्ट इ.स. १९९४ आणि ९ डिसेंबर, इ.स. २००१ ते ६ एप्रिल, इ.स. २००४ या कालखंडांत दोन वेळा श्रीलंकेचा पंतप्रधान होता. तो नोव्हेंबर, इ.स. १९९४ पासून युनायटेड नॅशनल पार्टीचा अध्यक्ष आहे. ऑक्टोबर, इ.स. २००९मध्ये तो संयुक्त राष्ट्रीय आघाडी या राजकीय पक्षांच्या आघाडीगटाचा नेता म्हणून नेमला गेला.