Jump to content

राम सुतार (शिल्पकार)

मराठीपिडिया कडून

राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. यांचा जन्म इ.स. १९२५ मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला. सुतार यांनी २००हून अधिक शिल्पे जगातील पाचही खंडांत बनवली आहेत. दिल्ली येथील संसद भवनाच्या प्रांगणात राम सुतार यांची शिल्पे आहेत.[]

जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

इ.स. १९५२ मध्ये सर जे. जे. आर्टस कॉलेजमध्ये शिल्पकलेची पदवी मिळवली. यावेळी त्यांना मानाचे मेयो सुवर्णपदक मिळाले. इ.स. १९५४ मध्ये भारतीय पुरातत्त्व खात्यात नोकरीची सुरुवात - औरंगाबाद येथे केली. अजिंठा-वेरूळ लेण्यांमधील खराब झालेल्या शिल्पांची डागडुजी करण्याचे काम त्यांनी केले. इ.स.१९५८मध्ये त्यांनी दिल्लीला स्थलांतर केले.

पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

  • इ.स.१९९९ - पद्मश्री
  • इ.स.२०१०- दि बॉम्बे आर्ट सोसायटीचा रूपधर जीवनगौरव पुरस्कार

दि बॉम्बे आर्ट सोसायटीचा रूपधर जीवनगौरव पुरस्कार

◆ इ.स .2016 टागोर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार (भारत सरकार)*2018ला प्रदान करण्यात आला

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्यदुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Commonscat