रायरीचा किल्ला

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

रायरीचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
साचा:किल्ला

पाचगणीचे टेबललॅड सर्वांनाच महितच असते मात्र त्याच्यापेक्षाही उंच आणि लांब असे टेबललॅड म्हणजे रायरीचे पठार. भोरपासून ८ कि.मी. अंतरावर असणारे हे रायरीचे पठार पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे. दाट झाडी खोल दऱ्या, उंचच्या उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट यामुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे.

इतिहास

शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली ती याच रायरेश्वराच्या पठारावर असलेल्या रायरेश्वर या शंभूमहादेवाच्या मंदिरात, वयाच्या १६ वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी या शिव पिंडीवर स्वतःच्या हाताची करंगळी कापून रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली. कान्होजी जेधे, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी पासलकर ,बापूजी मूदगल, सोनोपंत डबीर, नरसप्रभु गुप्ते या आपल्या बारा मावळातील सवंगड्यांच्या साथीने २७ एप्रिल १६४५ रोजी स्वराज्याची शपथ घेतली

गडावर पाहण्यासारखी ठिकाणे

रायरेश्वरावर पाहण्यासारखे काही नाही. रायरेश्वराचे पठार हे ५ ते ६ कि.मी. पसरलेले आहे.

  • त्यामुळे या पठारावरील वर्षाऋतुत पाहण्यासारखे असते.
  • रायरेश्वरावर शंभुमहादेवाचे मंदिर पांडवकालीन आहे.
  • जलकुंड आहे तेथे बारा महिने पाणी असते.गोमुखातून हे पांनी कुंडात येते.
  • पांडव लेणी
  • सप्तरंगी मातीच ठिकाण (विभूत खाण)
  • शिवकालीन तळी - वारझोती , देऊळ
  • पठारावर भात शेतीचे प्रमाण ही मोठे आहे.

गडावर जाण्याच्या वाटा

रायरेश्वराला जाण्याचे अनेक मार्ग आहेत. कोणत्याही मार्गाने जायचे झाल्यास भोर गावं गाठावे.

  • टिटेधरण कोर्लेबाजूने: पुण्याहून भोरमार्गे आंबेवडे गाठवे. तेथून टिटेधरण कोर्लेबाजूने रायरेश्वरावर जाता येते. वेळे साधारण ३ तास लागतात. वाट काही ठिकाणी अवघड आहे.
    • भोर-रायरी मार्गे: भोर गावातून रायरी गावासाठी सकाळी ११.०० व सायंकाळी ६.०० वाजता (मुक्कामाची) गाडी येते. याच वाटेला सांबरदऱ्याची वाट म्हणून देखील संबोधतात. या वाटेने रायरेश्वर गाठण्यास २ तास लागतात.
      • केजंळगडावरूनः केजंळगडावरून सूणदऱ्याने किंवा श्वाणदऱ्याने सूद्धा रायरेश्वराला जाता येत.

बाह्य दुवे

साचा:महाराष्ट्रातील किल्ले