Jump to content

रावसाहेब कसबे

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट साहित्यिक

डॉ. रावसाहेब राणोजी कसबे ( १२ नोव्हेंबर, १९४४) हे मराठी लेखक आहेत. त्यांच्या झोत या पुस्तकात त्यांनी माधव सदाशिव गोळवलकर यांच्या द बंच ऑफ थॉट्स या पुस्तकातील विचारांची व त्या अनुषंगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीची समीक्षा केली आहे.[]

पुस्तके[संपादन | स्रोत संपादित करा]

रावसाहेब कसबे यांनी लिहिलेली पुस्तके खालीलप्रमाणे आहेत.[]

  • डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना[]
  • आंबेडकर आणि मार्क्स[]
  • आंबेडकरवाद - तत्त्व आणि व्यवहार[]
  • झोत
  • देशीवाद समाज व साहित्य
  • धर्मग्रंथ आणि मानवी जीवनप्रवाह
  • भक्ती आणि धम्म
  • मानव आणि धर्मचिंतन
  • रेषेपलीकडील लक्ष्मण
  • हिंदू मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद
  • सम्यक प्ररिवर्तन

मिळालेले सन्मान व पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

  • गदिमा प्रतिष्ठानचा स्नेहबंध पुरस्कार (२०११)
  • मिलिंद कला महाविद्यालयातर्फे मिलिंद समता पुरस्कार (२०१४)
  • रावसाहेब कसबे हे नाशिकमध्ये भरलेल्या पाचव्या "कॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे‘ अध्यक्ष होते. (४-५ जानेवारी २०१४)
  • सुगावा प्रकाशनाचा ’सुगावा पुरस्कार’ (२०१४)
  • रावसाहेब कसबे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे २०११ ते २०१६ या काळासाठीचे दोघांतले एक उपाध्यक्ष आहेत. (दुसरे चंद्रकांत शेवाळे)
  • २०१५ सालच्या ५व्या सम्यक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
  • रावसाहेब कसबे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

  • झोत सुगावा प्रकाशन, पुणे. लेखक परिचय.

साचा:मराठी साहित्यिक