Jump to content

रासबिहारी बोस

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट चळवळ चरित्र रासबिहारी बोस (साचा:Lang-bn) (मे २५, इ.स. १८८६; सुबलदाह, बर्धमान जिल्हा, बंगाल प्रेसिडेंसी - जानेवारी २१, इ.स. १९४५; टोकियो, जपान) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक नेते होते. गदर मुक्ती आणि नंतर भारतीय राष्ट्रीय सेना या संस्थांचे ते मुख्य संयोजक होते.

क्रांतिकारी कार्य[संपादन | स्रोत संपादित करा]

रासबिहारींना सुरुवातीपासूनच क्रांतिकारी कृतीत रस होता. सुरुवातीची काही वर्षे रासबिहारी पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात राहिले. त्यांनी १९०८ मध्ये अलिपोर बॉम्बचा खटला चालविण्यासाठी बंगाल सोडले. डेहराडून येथे त्यांनी वन संशोधन संस्थेमध्ये प्रमुख कारकून म्हणून त्यांनी काम केले. तेथे, युगंतरच्या अमरेन्द्र चटर्जीद्वारे ते गुप्तपणे बंगालच्या क्रांतिकारकांसोबत सहभागी झाले. तिथे त्यांची ओळख युनायटेड प्रॉव्हिन्सेस (सध्याचे उत्तर प्रदेश) आणि पंजाबमधील आर्य समाजातील अनेक प्रमुख क्रांतिकारी सदश्यांशी झाली.[]

राशबिहारींच्या नेतृत्वाखाली २३ डिसेंबर १९१२ रोजी लॉर्ड हार्डिंग हे किंग जॉर्ज पाचव्याच्या दिल्ली दरबारमधून परत येत असतानाचा त्यांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. अमरेंद्र चॅटर्जींचे शिष्य बसंत कुमार विश्वास यांनी मणिंद्र नाथ नायक ह्यांनी बनवलेला बॉम्ब हार्डिंगच्या हौदात फेकला. पण या हल्ल्यात हार्डिंग बचावले आणि हा कट फसला व त्यानंतर राशबिहारींना अद्यातवासात जावे लागले.[] जवळपास ३ वर्षे राशबिहारींनी ब्रिटिश सरकारला यशस्वीपणे हुलकावणी दिली. या दरम्यान ते गदर कटात सामील झाले. तद्नंतर ब्रिटिशांनी त्यांचा कसून शोध सुरू केला. पुढील कार्यासाठी त्यांनी जपानला पलायन केले. साचा:विस्तार

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:भारतीय स्वातंत्र्यलढा

  1. Two Great Indian Revolutionaries: Rash Behari Bose and Jyotindra Nath Mukherjee by Uma Mukherjee, १९६६, पान क्र. १०१
  2. साचा:स्रोत बातमी