रोहिणी गोडबोले

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट शास्त्रज्ञ डॉ.रोहिणी गोडबोले या भारतीय शास्त्रज्ञ आहेत. त्या मूळच्या पुण्याच्या आहेत.

शैक्षणिक पार्श्वभूमी

गोडबोले यांचे शालेय शिक्षण पुण्यातील हुजूरपागा शाळेत झाले आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून झाले. त्यांनी १९७२ साली बी.एस.सी.ची पदवी मिळवली, तेव्हा त्या पुणे विद्यापीठात पहिल्या आल्या होत्या. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथून त्यांनी एम.एस.सी.ची पदवीही पहिल्या क्रमांकाने मिळवली.

१९७९ साली अमेरिकेच्या स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यू यॉर्कमधून त्या पीएच्.डी.झाल्या.

त्यांनी पदार्थ विज्ञान या विषयात संशोधन केले.

संशोधन कारकीर्द

पीएच्.डी.नंतर ३ वर्षे गोडबोले यांनी मुंबईत टी.आय.एफ.आर.मध्ये काम केले. नंतर ४ महिने मुंबईला रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये आणि १२ वर्षे मुंबई विद्यापीठात सुरुवातीला व्याख्याती आणि नंतर अधिव्याख्याती म्हणून काम केले. त्या सध्या (२०१९ साली) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळूरू येथे काम करतात. कण भौतिकी, उच्च ऊर्जा भौतिकी आणि कोलायडर भौतिकी या विषयांत त्यांनी चाळीसहून अधिक वर्षे संशोधक प्राध्यापक म्हणून काम केले आहे.

योगदान

डॉ. गोडबोले युरोपीय संशोधन प्रयोगशाळा, सर्नमधील आंतरराष्ट्रीय लिनियर कोलायडरच्या इंटरनॅशनल डीटेक्टर ॲडव्हायझरी ग्रुप (आयडीएजी) मध्ये २००७ ते २०१२ या कालावधीत सहभागी झाल्या होत्या. इंटरनॅशनल डीटेक्टर ॲडव्हायझरी ग्रुप आयएलसी डीटेक्टरचे संशोधन, संशोधन संचालनालयाचा विकास यावर आणि डीटेक्टर डिझाईन गटांवर लक्ष ठेवतो.

त्या भारतीय विज्ञान अकादमीच्या विज्ञान क्षेत्रातील स्त्रियांच्या पुढाकाराबद्दल काम करणाऱ्या सदस्य गटाच्या अध्यक्षा आहेत.

लेखन

  • 'सायन्स कारकीर्द फॉर इंडियन विमेन' या विषयावरील भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या अहवालाच्या सहलेखिका
  • 'लीलावतीज डॉटर्स' या १०० निवडक भारतीय संशोधिकांवरील पुस्तकाच्या संपादिका आणि सहलेखिका[१]
  • 'द गर्ल्स गाइड टु ए लाइफ इन सायन्स' या पुस्तकाच्या सहसंपादिका[२]

पुरस्कार

  • फ्रान्सचा नॅशनल ऑर्डर ऑफ मेरीट सन्मान, फ्रान्स आणि भारत यांच्यातील संयुक्त संशोधन प्रकल्प तसेच मूलभूत विज्ञान संशोधनात महिलांचे प्रमाण वाढावे, यासाठी केलेल्या कामगिरीबद्दल (२०२१)[३] 
  • २०१९ साली पद्मश्री पुरस्काराने गौरव[४]
  • इंडियन फिजिक्स असोसिएशनतर्फे देण्यात येणारा आर. डी. बिर्ला स्मृती पुरस्कार ,२०१९ [५]
  • आय.आय.टी., मुंबईच्या मानांकित माजी विद्यार्थी म्हणून गौरव[६]
  • न्यू इंडियन एक्स्प्रेस ग्रुपचे देवी पारितोषिक, ऑगस्ट २०१५[७]
  • स्त्री शक्ती पुरस्कार, आदित्य प्रतिष्ठान, पुणे २०१५ [८]
  • २०१३मध्ये एस.एन.डी.टी. विद्यापीठाकडून डी.लिट. पदवी देऊन सन्मान
  • सी.व्ही.रामन महिला विज्ञान पुरस्कार, स्वदेशी विज्ञान आंदोलन कर्नाटक यांच्यातर्फे, २०१०
  • भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीकडून सत्येंद्रनाथ बोस पदक, २००९[९]
  • जे.सी.बोस फेलोशिप, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, २००८-२०१८ [१०]
  • सैद्धांतिक भौतिक शास्त्रातील कामगिरीसाठी एशियाटिक सोसायटीकडून मेघनाद साहा पदक, २००७

संदर्भ