ललितपूर
Appearance
साचा:माहितीचौकट शहर ललितपूर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक शहर व ललितपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. ललितपूर शहर उत्तर प्रदेशच्या दक्षिण भागात बुंदेलखंड भौगोलिक प्रदेशात वसले असून ते लखनौच्या ४२५ किमी नैऋत्येस तर मध्य प्रदेशमधील भोपाळच्या २५० किमी ईशान्येस स्थित आहे.
वाहतूक[संपादन | स्रोत संपादित करा]
ललितपूर रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावर असून ते ह्या भागातील एक महत्त्वाचे जंक्शन मानले जाते. ललितपूर विमानतळ आजच्या घडीला वापरात नाही.