वरदा गोडबोले

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:बदल साचा:माहितीचौकट गायक

वरदा गोडबोले (जन्मदिनांक अज्ञात - हयात) या लोकप्रिय हिंदुस्तानी गायिका आहेत

पूर्वायुष्य

वरदा गोडबोले यांचे संगीताचे शिक्षण किराणा घराण्याचे पं अच्युतराव अभ्यंकर, ठुमरीचे शिक्षण सुशिलाताई पोहनकर व पं अजय पोहनकर, पं. यशवंतबुवा महाले आणि पं. मधुबुवा जोशी यांच्याकडे झाले.साचा:संदर्भ हवा साचा:विकिकरण

सांगीतिक कारकीर्द

वरदा गोडबोले यांना मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून कलाशाखेच्या पदवी परीक्षेत संस्कृत विषयात सुवर्णपदक मिळवून विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा मान मिळाला आहे. त्याचप्रमाणे त्या मुंबई विद्यापीठात संगीत विषयात पदव्युत्तर (एम ए) परीक्षेत संगीत विषय घेऊन सर्वप्रथम आल्या आहेत.

शिष्यवृत्ती

त्यांना आतापर्यंत अनेक बक्षिसे व शिष्यवृत्त्या मिळाल्या असून त्यात पंडित भीमसेन जोशी शिष्यवृत्तीचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्याचसोबत केंद्र सरकारच्या दोन शिष्यवृत्त्यांचाही समावेश आहे. वरदा गोडबोले यांना आचार्य रातंजनकर यांच्या नावाची दोन वर्षांची मानाची शिष्यवृत्ती मिळाली आहे.

वरदा गोडबोले यांच्या भारतात अनेक ठिकाणी गाण्याच्या मैफली झाल्या आहेत. नितीन देसाईकृत बालगंधर्व या मराठी चित्रपटात वरदा गोडबोले यांनी पार्श्वगायन केले आहे.साचा:संदर्भ हवा

संगीत ध्वनिमुद्रिका

पुरस्कार व सन्मान

२०१४ या वर्षी वरदा गोडबोले यांना अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाची संगीताचार्य ही सर्वोच्च पदवी मिळाली. साचा:विस्तार साचा:हिंदुस्तानी संगीत साचा:संगीतातील अपूर्ण लेख