वरुड

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र


'वरूड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचा एक तालुका आहे.

वरूड तालुक्यातील मोठी गावे :- शेंदुरजणाघाट, राजुरा बाजार, बेनोडा, लोणी, जरूड, वाठोडा, हातुर्णा, पुसला, सावंगी.



जरुड एक गांव

ग्राम पंचायत : जरुडता. वरुड, जि.अमरावती

       महाराष्ट्र राज्य 444908

   

जरुड हे गाव अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादनाकरीता  ओळखल्या जाणाऱ्या वरुड तालुक्याला एक वेगळीच ओळख प्राप्त करून देणारे असे एक गांव आहे. हे गांव वरुड तालुक्याच्या ठिकाणापासून पश्चिमेला 4 कि.मी. अंतरावर अमरावती रोड वर आहे. हे गांव म्हणजे अनेक संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्य नगरी असून राष्ट्रसंतांच्या विचारावर व यथोचित मार्गावर चालत असलेले गांव आहे. या गावातील लोकसंख्या 25 हजारचे वर असून येथील अनेक लोक वेगवेगळ्या संप्रादायातून येणारे असून सुद्धा या पावन भूमीतील लोक एकमेकांसोबत अत्यंत गुण्या गोविंदाने राहत असून या गावाची रचना ही वैविद्यपुर्ण अशी आहे.

जरुड हे गाव उत्तरेकडून वाहत येणाऱ्या सातपुडा पर्यताच्या लगत सुकी नदीच्या काठी वसलेले असून ते पुर्वे कडे विस्तारत गेलेले आहे. सुकी नदी ही उत्तरेकडून दक्षिणेकडे गावाच्या मध्यभागातून ऋतू मध्ये जवळपास दोन महिने सतत वाहत असून तहानलेल्या सृष्टीची तहान भागवून येथील शेतकरी व शेतमजूर व गावातील लोकांमध्ये एक नवा उत्साह व नवी उमेद जागविते.

जरुड या गावाच्या रचनेचा अभ्यास करावयाचा झाल्यास या गावाची ही अत्यंत सुंदर अशी आहे. या गावाच्या अगदी पुर्वेला तालुक्यातील भव्य अशी सर्वात मोठे उत्क्रांती संस्थेचे महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना सुशिक्षीत करून त्यांना एक जगण्याची उत्तम दिशा ठरवून देते. या संस्थेमध्ये लहान मुलांच्या कॉन्व्हेंट पासून तर अंगणवाडी विभाग तसेच प्राथमिक व हायस्कुल विभाग त्याच बरोबर उच्च शिक्षणाची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर विज्ञान शाखा, कला शाखा, वाणिज्य,औद्योगिक शाखा, विधी शाखा, बी.सी.ए. महाविद्यालय, किमान कौशल्यावर आधारीत असे शिक्षण, खेळ, शास्त्र, संगीत व सांस्कृतिक असा वारसा जपणारे शिक्षण या संस्थेतील शिक्षक विद्यार्थ्यांना मोठ्या आत्मीयतेने देत असतात. असे ज्ञानदानाचे महान असे कार्य जरुड येथील उत्क्रांती या संस्थेमार्फत केले जाते. त्याच बरोबर जरुड गावामध्ये गावाच्या पश्चिमेला सुकी नदीच्या पश्चिमेकडे बाळासाहेब देशमुख कन्या शाळा, जरुड असून या शाळेमध्ये मुलींना दहाविपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते. तर याच शाळेच्या पुर्वेकडे सुकी नदीच्या बाजूला जरुड हायस्कुल जरुड हे महाविद्यालय आहे. ही संस्था भाऊसाहेब पंचाबराव देशमुख यांच्या श्री.शिवाजी शिक्षण संस्थेचे असून या ठिकाणी वर्ग 5 ते 10 वी पर्यंतचे शिक्षण आजूबाजूच्या गावांतील गरीब विद्यार्थ्यांना मोफत दिले जाते. तर याच ठिकाणी पी.जी.राऊत कनिष्ठ महाविद्यालय असून वर्ग 11 वी व 12 वी कला शाखेचे शिक्षण या महाविद्यालय मार्फत दिले जाते. या शाळेच्या अगदी समोरच वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस चौकीची स्थापना करण्यात आली असून या चौकी अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रामध्ये व गावांमध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम केल्या जाते.

जरुड या गावाच्या दक्षिणेकडील भागात सुकी नदीच्या काठावर पारंपारिक पद्धतीने अत्यंत निसर्गरम्य शांत व मोकळ्या वातावरणात सुकी नदी या जलवाहीनीच्या काठावर आठवडी बाजार दर रविवारी भरत असून या बाजारामध्ये आपला माल व भाजीपाला घेऊन येणाऱ्या दुकानदार वर्गाकरीता उत्तम पद्धतीचे स्वच्छ व सुंदर असे बाजार ओटे येथील स्थानीक ग्राम पंचायत जरुड अंतर्गत करण्यात आलेले आहेत. तसेच बाजारामध्ये सावली करीता मोठे असे पाच ते सहा वट वृक्षांची लागवड करण्यात आलेली असून येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची उत्तम सुविधा करण्यात आली आहे. येथील बाजार हा तालुक्यातील बाजारांपैकीच महत्त्वपुर्ण असा बाजार गणल्या जातो. या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे याठीकाणी तालुक्याच्या ठिकाणापेक्षा बाजार स्वस्त दरात ताजा असा भाजीपाला उपलब्ध होतो त्यामुळे बाजारामध्ये आजूबाजूच्या दहा ते बारा गावातील असंख्य क्रेते व विक्रेते येत असतात.

गावाच्या हिताच्या विकासात्मक व पर्यावरणाला पुरक अशा दृष्टीने येथील सरपंच यांनी आपल्या सहकार्यांना हाताशी घेऊन विविध योजणांमार्फत विकास कामे आखून पूर्ण करून घेतलेली आहेत. त्यामध्ये येथील स्थ्ज्ञानीक रस्ते, सांडपाण्याच्या नाल्या, सार्वजनीक स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची उत्तम अशी घरोघरी नळ सुविधा, गावामध्ये धार्मिक स्थळांचे सौदर्यीकरण, गावामध्ये वृक्षलागवड, भू विकासात्मक कामे अशा विविध कामांचे मंजूरी आदेश प्रशासनाकडून घेऊन ती तेथील सरपंच व प्रशासन यांनी पुर्नत्वास नेलेली आहेत. तसेच सरपंच श्री.देशमुख यांनी सत्तेत आल्यानंतर संपूर्ण गावाचा विकासात्मक दृष्टीने कायापालट करून सर्व प्रथम येथील स्थानिक स्मशानभूमिमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजणा मार्फत दोन्ही स्मशानभूमी मध्ये वृक्षलागवड करून गावातील बेरोजगार विधवा व गरीब मजूरांना रोजगार उपलब्घ करून दिला आहे. तसेच स्थ्ज्ञानिक शाळेमध्ये तसेच गावालगत रस्ता दुतर्फा रुक्षलागवड करून ती जोपासण्याकरीता येथील बेरोजगार मजूरांच्या हाताला काम दिलेले आहे. येथील संपूर्ण रोजगार हमी योजणेची माहिती मजूरांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी सरपंच यांनी ग्रामसभेमधून सक्षम अश रोजगार सेवकाची निवडकरून त्यांचेवर सोपविलेली आहे. यामुळे गावामध्ये बेरोजगारी बऱ्यापैकी कमी झालेली आहे व गावातील मजूरांना गावातच काम उपलब्ध झाल्यामुळे मजूरांचे स्थालांतर होण्याचे प्रमाण घटले आहे.

💥💥💥💥💥💥

     ✍ *लेखन*

©शिवदास भंडारी, जरुड

मो. @+917798976528साचा:विस्तार साचा:अमरावती जिल्ह्यातील तालुके