Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
विचित्रवीर्य - मराठीपिडिया Jump to content

विचित्रवीर्य

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: १२.५ MP पेक्षा जास्त आकार असणारी संचिका

विचित्रवीर्य हे महाभारतातील एक पात्र आहे. तो हस्तिनापूरचा राजा शंतनूसत्यवती यांचा मुलगा, चित्रांगदाचा लहान भाऊ व भीष्माचा सावत्र भाऊ होता.

चित्रांगदाच्या मृत्यूनंतर भीष्माच्या देखरेखीखाली विचित्रवीर्याला हस्तिनापूरचा राजा बनवले गेले. भीष्माची इच्छा असते की त्याचा विवाह काशीच्या राजाच्या मुली अंबा, अंबिकाअंबालिका यांच्याशी व्हावा. मात्र जुन्या वितुष्टामुळे काशीचा राजा हस्तिनापूर साम्राज्याला स्वयंवराचे आमत्रण देत नाही. तेव्हा क्रोधित होऊन भीष्म स्वयंवरात जातो व तेथील उपस्थित राजांना पराजित करून अंबा, अंबिका व अंबालिकाला घेऊन हस्तिनापूरला घेऊन येतो. मात्र अंबाने मनोमन शाल्व राजकुमाराला आपला पती मानले असल्यामुळे अंबिका व अंबालिका यांचा विवाह विचित्रवीर्यासोबत करून दिला जातो.

मात्र विवाहानंतर मूल होण्याच्या आधीच क्षय रोगाने विचित्रवीर्याचा मृत्यू होतो. तेव्हा सत्यवतीच्या आज्ञेनुसार व्यासांकडून अंबिका, अंबालिका व त्यांची एक दासी यांना अनुक्रमे धृतराष्ट्र, पांडूविदुर ही मुले होतात. अंबिका व्यासांना पाहताच त्यांची वाढलेली दाढी व रूप पाहून भीतीने डोळे मिटून घेते त्यामुळे तिचा पुत्र धृतराष्ट्र जन्मतः अंध असतो. अंबालिका व्यासांना पाहून भीतीने पांढरीफटक पडते त्यामुळे तिचा पुत्र पांडू कोड घेऊन जन्मतो. दासी मात्र धीटपणे व्यासांना सामोर गेल्याने तिचा पुत्र विदुर ज्ञानी म्हणून जन्मतो. धृतराष्ट्र जेष्ठ भाऊ असूनसुद्धा तो जन्मजात अंध असल्यामुळे पांडू हस्तिनापूरचा विचित्रवीर्यानंतरचा राजा बनतो.

साचा:महाभारत