विमलसूर्य चिमणकर
साचा:माहितीचौकट साहित्यिक मार्शल विमलसूर्य चिमणकर (७ सप्टेंबर १९५५ - ३० सप्टेंबर २०२०) हे मराठी साहित्यिक, विचारवंत, वकील, अभ्यासक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. ते आंबेडकरवादाचे भाष्यकार होते, समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक होते. आंबेडकरी चळवळ पुनर्स्थापित होऊन एकसंघ व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. त्यांचे द्वितीय महायुद्ध आणि डॉ. आंबेडकर हे पुस्तक अधिक लोकप्रिय ठरले असून जागतिक पातळीवर या पुस्तकाची दखल घेण्यात आली.[१][२][३]
चिमणकर विद्यार्थी जीवनापासूनच आंदोलनांत सक्रिय होते. त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतरणात भाग घेतला होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एकत्रीकरणासाठी त्यांनी अनेकदा प्रयास केले. समता सैनिक दलाच्या बळकटीकरणासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले.[१][२][३] ते बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून बौद्ध बनले होते.[४]
निधन[संपादन | स्रोत संपादित करा]
३० सप्टेंबर २०२० रोजी वयाच्या ६५व्या वर्षी त्यांचे निधन झाले.[१][२][३]
लेखन[संपादन | स्रोत संपादित करा]
चिमणकर यांनी इत्यादी पुस्तके लिहिली आणि प्रकाशित आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:[२][५][३]
- द्वितीय महायुद्ध आणि डॉ. आंबेडकर (१९९३)
- रिडल्स नंतरचा जातीय वणवा
- दोन सूर्य दोन घुबडे
- सूर्यांकुर
- मार्क्स आणि आंबेडकर एक द्वंद
- नामांतर वा सत्तांतर
- खैरलांजी एक सवाल
- वेटिंग फार व्हिसा
- साकेत कि अयोध्या?