विश्वकर्मा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार भगवान विश्वकर्मा देवांचे वास्तुकला तज्ञ आहेत. त्यांनी भगवान श्रीकृष्णासाठी द्वारका,पांडवासाठी हस्तिनापूररावणासाठी सोन्याची लंका तयार केली. या नगरांच्या रचनेत, सौंदर्य, अचुकता व सुखसोयी यांचा मिलाप होता.ते वास्तुशास्त्राचे पहिले प्रणेते आहेत.भगवान विश्वकर्मा यांनी लंकेत प्रवेश करण्यासाठी श्रीरामाला सहकार्य केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच महाबली हनुमान, नल−निल या सारख्या वानरसेनेतील स्थापत्य तज्ञांनी रामसेतू बांधला.भगवान विश्वकर्मा यांनी १४ ब्रम्हांडाची रचना केली. त्यात वायुमंडळ, कैलास,वैकुंठ, ब्रम्हपुरी, इंद्रपुरी,स्वर्ग, पृथ्वी, पाताळातील नागलोक इत्यांदिंची रचना केली होती.साचा:चित्र हवे

त्यांनी 'विश्वकर्मा वास्तुशास्त्र' या ग्रंथाची रचना केली.ब्रह्माच्या इच्छेनुसार त्यांनी नित्य नवीन औजारे शोधलीत.त्यांना सौर उर्जा वापरण्याचे व त्या उर्जेच्या नियंत्रणाचे ज्ञान प्राप्त होते. सूर्याचे या शक्तिचा वापर करून त्यांनी विष्णू शिवइंद्रासाठी क्रमाने सुदर्शन चक्र, त्रिशूळ व विजय रथ निर्माण केला.ते हरहुन्नरी होते.अन्य विविध शास्त्रांच्या निर्माणात, त्याचे नियम ठरविण्यात,व त्या त्या शास्त्रांच्या विकासास त्यांनी हातभार लावला.शस्त्रे व अस्त्रे, अलंकार, विमान आदिंचेही त्यांनी निर्माण केले.सुमारे १२०० च्या जवळपास यंत्र-तंत्र,शस्त्रास्त्रे व साधनांच्या त्यांनी निर्मिती केली.पांडवांसाठी मयसभा बनविणारा मयासूर त्यांचा शिष्यच होता.साचा:संदर्भ हवा

आजही सोनार,लोहार,सुतार,कुंभार,कासार इत्यादी समाज त्यांना आपले दैवत मानतात.भारतात दिनांक १७ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय श्रम दिवस आणि त्यांची जयंती म्हणुन साजरा करण्यात येतो.साचा:संदर्भ हवा