वैदिक

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:बदल भारतीय संस्कृतीचे आद्य ग्रंथ म्हणजे वेद. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद,अथर्ववेद या वेदांमधील जे विचार त्यांना वैदिक असे म्हटले जाते. त्याला अनुसरून जे आचरण केले जाते त्याला वैदिक परंपरा असे म्हणतात. १)ऋग्वेद:देवतांची स्तुती करण्यासाठी रचलेली पदे आहेत.या पदांना "ऋचा"असे म्हटले जाते.अनेक ऋचा एकत्र गुंफून "सुक्त" तयार होते.अनेक सुक्तांचे मिळून "मंडल"तयार होते. २)यजुर्वेद:यज्ञ विधीमध्ये म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचे संकलन करून त्यांचे स्पष्टीकरण केलेले आहे.त्या मंत्रांचा उपयोग केव्हा आणि कसा करावा याचे मार्गदर्शनही केलेले आहे.यज्ञात म्हटले जाणारे हे मंत्र म्हणजे ऋचाच होय. ३)सामवेद:यज्ञ विधीमध्ये ऋग्वेदा मधील ऋचाचे मंत्रस्वरुपात गायन कसे करावे याचे मार्गदर्शन केलेले आहे.भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचे स्थान महत्त्वाचे आहे. ४)अथर्ववेद:दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी संबंधीचा विचार केलेला आहे.त्यामध्ये आयुष्यातील संकटे,दुखणी यांवर करायचे उपाय आणि औषधयोजना त्यांची माहिती दिलेली असते.राजनीती संबंधीची माहिती त्यात आढळते.