व्यतिपात

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

जेव्हा चंद्रक्रांती आणि सूर्यक्रांती मापाने सारख्याच असतात तेव्हा 'पात' धरतात. चंद्र आणि सूर्य जेव्हा एकाच बाजूस असतात, तेव्हा व्यतिपात होतो आणि जेव्हा विरुद्ध बाजूस असतात तेव्हा वैधृतिपात होतो.[१] [२][३]

ज्या वेळेस 'पात' होतो त्या वेळेपासून क्रांतीमध्ये मागे अर्धा अंश व पुढे अर्धा अंश अंतर पडण्यास जो वेळ लागतो, त्या वेळा सूर्योदयानंतरच्या काढून मांडतात. पहिल्या काळाला प्रवृत्ती आणि दुसऱ्या काळाला निवृत्ती असे नाव आहे.[४]

पंचांगात पाताचा वेळ दिलेला नसतो. पात नेहमी संक्षिप्त रूपाने दिलेला असतो. उदा० व्य.पा.प्र., व्य.पा.नि. वगैरे. पात हा काळ शुभ कार्यास वर्ज्य करावा असा शास्त्रसंकेत आहे.

संदर्भ

साचा:संदर्भयादी