Jump to content

शंकरबापू आपेगावकर

मराठीपिडिया कडून

शंकरबापू आपेगावकर (इ.स. १९११ - ९ जानेवारी, इ.स. २००४) हे राष्ट्रीय ख्यातीचे पखवाजवादक आहेत.[] हे वारकरी प्रकारचे पखवाजवादन करीत[] त्यांना १९८६मध्ये पद्मश्री पुरस्कार दिला गेला[]

यांचे मूळ नाव शंकर शिंदे होते. यांचा मुलगा उद्धवबापू आपेगावकर हाही पखवाजवादक आहे.[]

शंकरबापू आपेगावकर यांचा जन्म अंबाजोगाई तालुक्यातल्या आपेगाव या छोट्या गावात इ.स. १९११मध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांना पखवाज वाजवायचा नाद होता.

शंकरबापू आपेगावकर यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान[संपादन | स्रोत संपादित करा]

  • पद्मश्री (१९८६)
  • मराठवाडा संगीत कला अकादमीकडून गौरव (१९९०)
  • मुंबईच्या स्वरसाधना समितीतर्फे सन्मान